जळगावमहाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त  भव्य राज्यस्तरीय पोवाडा स्पर्धा

प्रतिनिधी – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त दि. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी  शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी एरंडोल येथे भव्य राज्यस्तरीय पोवाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थी आणि शालेय स्तरावरील कलाकार  राज्यभरातून पोवाडा सादर करणारे कलाकार स्पर्धेतील सहभाग घेऊ शकतात.
     स्पर्धेत विजेत्यांना आकर्षक पारितोषिके आणि प्रमाणपत्रे देण्यात येतील. सर्व विद्यार्थी आणि कला क्षेत्रातील प्रेमींनी या ऐतिहासिक आणि प्रेरणादायक कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्या उत्साहाने आणि कलेने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी नविन उपक्रम राबविण्यात येत आहे.कार्यक्रमात सर्व विद्यार्थी आणि कला प्रेमींना सहभागी होण्याचे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात येत आहे.
    कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून, आपली माहिती भरा व पोवाडा सादरीकरणाचा एक व्हिडिओ अपलोड करून सहभाग नोंदवावा. नोंदणी शुल्क मात्र रु.१००/-  असून प्राप्त झालेल्या सर्व व्हिडिओ पैकी उत्कृष्ठ १५ सहभागी सदस्यांना अंतिम फेरीसाठी महाविद्यालयात स्वखर्चाने येऊन पोवाडा सादर करावा लागेल. अंतिम विजेत्यांची निवड १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त असलेल्या कार्यक्रमात परीक्षक करतील परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल. 
*रजिस्ट्रेशन लिंक*:- https://forms.gle/8xKWptZugpJ8ZvX3A

*रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख १३/०२/२०२५*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button