भुमिअभिलेख कार्यालयातून लॅपटॉप चोरणाऱ्या तरुणाला अटक…

प्रतिनिधी अमळनेर:- येथील भूमी अभिलेख कार्यालयातून महत्वाचे दस्तऐवज असलेला लॅपटॉप चोरून नेणाऱ्या आरोपीला अटक करून अमळनेर पोलिसांनी लॅपटॉप ताब्यात घेतला आहे.

याबाबत स्मिता पोरशा गावित यांनी ३ एप्रिल रोजी ते दि. ४ एप्रिल शहरातील स्टेशन रोडवरील भुमी अभिलेख कार्यालयाचे कुलुप तोडुन, अज्ञात आरोपीने फिर्यादी यांचा 30,000/- रुपये किमतीचा लेनोवो कंपनीचा लॅपटॉप चोरीस गेल्याबाबत तक्रार दिली होती. परि. पोलीस उपअधिक्षक केदार बारबोले व दत्तात्रय निकम यांनी चोरीच्या शोध घेण्यासाठी पथकाला सूचना दिल्या होत्या. या गुन्ह्याचे तपासी अंमलदार पोहेकॉ अशोक साळुंखे, पोहेकॉ मिलींद सोनार, पोहेकॉ विनोद भोई, पोकॉ निलेश मोरे, विनोद संदानशिव यांना तपासादरम्यान प्रशांत जगन वाल्डे (वय 30 वर्षे, रा. मोठे गोरगावले बु। ता. चोपडा जि. जळगांव) याच्यावर संशय आल्याने त्याला अटक करत त्याची पोलीस कस्टडी घेतली असता, आरोपीने लॅपटॉप चोरी केल्याचे कबूल करत सदर लॅपटॉप काढुन दिला. सदर गुन्ह्यात तात्काळ कारवाई करून आरोपीला अटक केल्याबद्दल अमळनेर पोलिसांच्या पथकाचे अभिनंदन करण्यात येत आहे.