एरंडोल येथे प्रथमच होणार अनुसूचित जमातीचा नगराध्यक्ष,नवख्यांना संधी तर दिग्गजांना डोक्याला ताण.

प्रतिनिधी – एरंडोल येथील नगर पालिकेचे आरक्षण जाहीर झाले असून अनुसूचित जमाती प्रवर्गातून निघाले असून गेल्या दोन,तीन वर्षांपासून तयारीला लागलेल्या दिग्गजांना मात्र धक्का बसला असून त्यांना आपल्या पक्षाचा नगराध्यक्ष करण्यासाठी जास्त कसरत करावी लागत आहे.एरंडोल नगर पालिकेत नगराध्यक्ष पद पहिल्यांदाच अनुसूचित जमाती साठी आरक्षण जाहीर झाले असून पहिल्यांदाच अनुसूचित जमातीच्या वर्गाला नगराध्यक्ष म्हणून स्थान मिळणार आहे.त्यामुळे स्थिती कुठे खुशी तर कुठे गम अशी झाली आहे.दिग्गज राजकारणी जे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत होते त्यांना मोठा धक्का पोहचला असून ज्यांनी कधी विचार देखील केला नव्हता ते आता नगराध्यक्षाच्या शर्यतीत असणार आहे.प्रत्येक राजकीय पक्ष अजूनही आपल्याच पक्षाचा नगराध्यक्ष होणार असल्याचा दावा करतांना दिसत आहे.
शहरात शिवसेना (शिंदे गट),शिवसेना (उबाठा गट), भाजपा,राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा गट),राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट ),राष्ट्रीय काँग्रेस व मनसे अशा राजकीय गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत परंतु यात सर्वात जास्त सक्रिय पदाधिकारी शिवसेना (शिंदे गट), भाजपा,व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा गट) या पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत.शिवसेना ( शिंदे गट ) पक्षातर्फे माजी नगरसेवक प्रा.मनोज पाटील गेल्या तीन वर्षांपासून नगराध्यक्ष पदासाठी जोरदार तयारीला लागले होते तर भाजपा पक्षाकडून माजी नगरसेवक योगेश महाजन व माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश परदेशी व इतर अपक्ष उमेदवार जोरदार तयारीला लागले होते परंतु आरक्षण जाहीर झाल्याने या सर्वांच्या मनसुब्यांवर पाणी फिरले.आता सर्वच पक्ष जरी आपल्याच पक्षाचा नगराध्यक्ष होणार असल्याचा दावा करत असला तरी भाजपा सोडून इतर पक्षाच्या नेत्यांना उमेदवार आयात करावा लागणार असल्याचे बोलले जात आहे. भाजपा तर्फे माजी नगरसेवक डॉ.नरेंद्र ठाकूर यांची उमेदवारी निश्चित मानली जात असली तरी भाजपा चे दोन गट असल्याने दोघांना एक उमेदवार मान्य करून घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.शहरात मात्र अनेक नावांची चर्चा होत असून भील समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख व जिल्हाध्यक्ष दिपक अहिरे यांच्या संपर्कात देखील अनेक राजकीय पक्षाचे वरिष्ठ नेते असून त्यांनी संपर्क केला असल्याची चर्चा आहे. दिपक अहिरे हे आदिवासी समाजात अनेक वर्षांपासून कार्य करीत असून त्यांचा समाजा सोबतच इतर समजात चांगला संपर्क आहे.अनेक राजकीय संघटनेचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यां बरोबर स्थानिक पदाधिकारी व नेते त्यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे तसेच अनेक वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करणारे पत्रकार प्रा.सुधीर शिरसाठ यांच्या पत्नी रेखा शिरसाठ यांच्या संपर्कात देखील अनेक राजकीय पक्षाचे वरिष्ठ व स्थानिक नेते असल्याचे बोलले जात असून त्याबद्दल स्वतः प्रा.सुधीर शिरसाठ व त्यांच्या पत्नी रेखा शिरसाठ यांनी हे खरे असल्याचे सांगितले परंतु आम्ही फक्त राजकीय पक्षाच्या चिन्हावरच निवडणूक लढणार असल्याचे रेखा शिरसाठ यांनी सांगितले.यानंतर माजी नगरसेवक शाम ठाकूर यांच्या पत्नी देखील इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.निवडणूक जवळ येतील त्याबरोबर इच्छुक उमेदवारांची यादी बहुतेक वाढण्याची शक्यता आहे.त्यामुळे आता राजकीय पक्षांची खूपच तारांबळ उडणार आहे.दरम्यान येणाऱ्या काळात अजून काय काय बघायला मिळते याबद्दल विविध चर्चा रंगत आहेत.अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी प्रथमच आरक्षण जाहीर झाल्याने मात्र या वर्गात आनंदाचे वातावरण तयार झाले असून उत्साह दिसून येत आहे.