५२ ग्रामपंचायतीचे २०२५ ते २०३० या कालावधीकरिता सरपंच पदाचे आरक्षण निश्चित……!

प्रतिनिधी एरंडोल – तालुक्यातील सर्व ५२ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सुरूवात करण्यासाठी २१ एप्रिल २०२५ रोजी येथे म्हसावद रस्त्यालगत डि.डी.एस.पी.महाविद्यालयाच्या इनडोअर स्टेडियममध्ये सकाळी ११ वाजता तहसीलदार प्रदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले.यावेळी नायब तहसीलदार संजय घुले, सुयोग कुलकर्णी व ग्रामीण भागातील पदाधिकारी उपस्थित होते.जसजसे ग्रामपंचायतीचे आरक्षण निश्चित केले जात होते तसतसे सरपंच पदासाठी इच्छुक असलेल्या ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरील हावभाव बदललेले दिसून आले.गणेश सोनवणे,वय १२ वर्षे या इ.७ वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या हस्ते सरपंच पदाच्या आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या.
एरंडोल तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच पदांचे आरक्षण पुढील प्रमाणे आहे.अनुसूचित जाती ३ जागा,अनुसूचित जमाती ९ जागा,ना.मा.प्रवर्ग ११ जागा,सर्वसाधारण २९ जागा.
१९९५ पासून ते २०२५ पर्यंत मागील आरक्षण वगळून चक्रानुक्रमे ना.मा.प्रवर्गाच्या २ जागांसाठी चिठ्ठ्या काढण्यात आल्या.
अनुसूचित जाती जमातीसाठीच्या सरपंच पदाच्या ग्रामपंचायती ह्या २०११ च्या जनगणणेभधील संबंधित प्रवर्गाच्या लोकसंख्येच्या टक्केवारी नुसार सर्वाधिक लोकसंख्येची टक्केवारी असलेल्या ग्रामपंचायतींना आरक्षण देण्यात आले आहे.या सभेत मनिषा अहिरे (नागदुली), योगराज खैरनार ( उमरदे),आर.एम.पवार,पी.आर.चव्हाण, भास्कर कोळी ( नागदुली), अशोक पाटील ( नागदुली), ज्ञानेश्वर महाजन ( उत्राण गु.ह.), अनिल पाटील ( उमरदे), निलेश मराठे ( भालगांव), संदीप वाघ ( वनकोठे),मुकेश चौधरी ( सोनबर्डी), ज्ञानेश्वर बडगुजर ( पिंपळकोठा बु.), शांताराम पाटील ( ताडे),विजय लोहार ( फरकांडे),चंद्रजीत पाटील ( खर्ची खु.), स्वप्निल पाटील ( खडकी खु.) आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रवर्ग निहाय सरपंच पदाचे आरक्षण पुढील प्रमाणे.
१) अनुसूचित जाती प्रवर्ग – वैजनाथ,निपाणे,फरकांडे- जानफळ.
२) अनुसूचित जमाती प्रवर्ग – पिंपळकोठे बु., पिंप्री प्र.चा.,खडके खु.,रिंगणगांव,खडकी बु.,कासोदा,पिंपळकोठे प्र.चा.,खेडगाव, हणमंतखेडे बु.- हणमंतखेडे मजरे.
३) ना.मा.प्रवर्ग – आडगाव,विखरण – चोरटक्की, वनकोठे – बांभोरी, जवखेडे सिम,सोनबर्डी, पिंप्री बु.,धारागिर, टोळी खु.,दापोरी,खेडी खु.सावदे प्र.चा.
४) सर्वसाधारण प्रवर्ग – तळई ,उत्राण अ.ह.,उत्राण गु.ह.,भातखेडे – पिंप्री सिम-वाघळूद सिम,कढोली,रवंजे बु.,नागदुली,भालगांव बु.- नंदगांव,जळू – पळासदळ,खडके बु.,बाह्मणे – आंबे,खडके सिम – गणेशनगर,ताडे, जवखेडे खु.पिंपळकोठा खु.,माळखेडे बु.- उमरे, रवंजे खु., उमरदे, जवखेडे बु.,गालापूर – मुगपाट,खर्ची खु.,अंतुर्ली खु.,टाकरखेडे, हनुमंतखेडे सिम,नानखुर्द बु.,वरखेडी,नानखुर्द खु.,पातरखेडे, आनंदनगर.