चामड्याची वाहतूक करणारा ट्रक जप्त…..!

प्रतिनिधी एरंडोल – येथे विनापरवाना चामड्याची वाहतूक करणारे वाहन मिळून आले.या वाहनात प्राण्यांच्या कातड्यांचे ५०० नग आढळून आले.सदरचा ट्रक मुद्देमालासह जप्त करण्यात आला असून या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी शहेजाद शेख नईम रा.कासोदा, मोहम्मद नदीम अब्दुल करीम रा.मालेगांव, मोहम्मद समीर मोहम्मद सादीक शेख रा.मालेगाव यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.जप्त झालेला ट्रक १० टायरचा असून त्याचा क्रमांक एम एच १९ झेड ९९०९ असा आहे.२ लाख रुपये किंमतीचे अंदाजे ५०० संशयित गोवंशी जनावरांची चामडी कातडी लाल तांबड्या रंगाची व ४०० रूपये प्रति नग असे एकूण १० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याप्रकरणी पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल विलास पाटील हे पुढील तपास करीत आहेत.