जळगावमहाराष्ट्रशैक्षणिक
आकाश ओम त्रिवेदीची एमबीएसाठी निवड झाली

प्रतिनिधी : येथील आकाश ओम त्रिवेदी याची देशातील प्रसिद्ध संस्था असलेल्या आयआयएम अहमदाबादमध्ये ‘एमबीए’ अभ्यासक्रमासाठी निवड झाली. त्रिवेदी याने कानपूर येथून बी. टेक. (कॉम्पुटर सायन्स) पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर एमबीए प्रवेशासाठी आवश्यक असलेली कॅट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याची निवड करण्यात आली. अहमदाबाद आयआयएममध्ये एमबीएसाठी निवड झालेला आकाश हा जिल्ह्यातील पहिलाच विद्यार्थी आहे. आकाशने यापूर्वी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसह राज्य व राष्ट्रीयस्तरांवरील विविध परीक्षांत यश प्राप्त केले आहे. केंद्र सरकारची एनटीएसई परीक्षाही तो चांगले गुण प्राप्त करून उत्तीर्ण आहे. आकाश हा प्रसिद्ध विधीतज्ज्ञ ॲड. ओम त्रिवेदी व गीताव्रती रेखा त्रिवेदी यांचे सुपुत्र आहे. त्याने मिळवलेल्या यशाबद्दल सर्वानी त्यांचे अभिनंदन केले