जागतिक पुस्तक दिन शास्त्री फार्मसी महाविद्यालयात साजरा

प्रतिनिधी शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे दिनांक २३ रोजी जागतिक पुस्तक दिवस साजरा करण्यात आला. जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिवस किंवा आंतरराष्ट्रीय पुस्तक दिवस म्हणूनही हा दिवस ओळखला जातो, हा वाचन, प्रकाशन आणि कॉपीराइटला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) द्वारे आयोजित केलेला वार्षिक कार्यक्रम आहे. महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाच्या वतीने जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात आला. पुस्तक हे आपले सर्वोत्तम उत्तम गुरू व मार्गदर्शक असतात असे प्रतिपादन महाविद्यालयाचे उपप्रचार्य डॉक्टर पराग कुलकर्णी यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्रा. जावेद शेख, करण पावरा, मंगेश पाटील, राहुल अहिरे, राहुल बोरसे, दिग्विजय पाटील, सुमेश पाटील, चंद्रभान पाटील, भूपेंद्र अहिरराव, कीर्ती पाटील, पूर्वा पापरीकर,अनिता वडवी, श्रद्धा शिवदे, गायत्री सूर्यवंशी, योगेश्वरी लोहार, मयुरी पाटील, दिपाली मोरे, दिवाकर नाना पाटील तसेच ग्रंथपाल मीना मोरे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. विजय शास्त्री व सचिव सौ. रूपा शास्त्री यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले तसेच महाविद्यालयातील सर्वच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी यांचे सहकार्य लाभले.