*एरंडोल येथे सरपंच पदासाठी महिला आरक्षण…..!*

प्रतिनिधी एरंडोल – येथे डि.डी.एस.पी महाविद्यालयाच्या इनडोअर स्टेडियममध्ये तालुक्यातील सरपंच पदासाठी महिला आरक्षणाची सोडत सभा प्रांताधिकारी मनिषकुमार गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली २२ एप्रिल २०२५ रोजी झाली.गणेश सोनवणे ( वय १२ वर्षे) या मुलाच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या.

यावेळी तहसीलदार प्रदीप पाटील, राजेंद्र याद्निक, सुयोग कुलकर्णी व ग्रामीण भागातील पदाधिकारी उपस्थित होते.
सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होताच भावी दावेदारांच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलतांना दिसत होते.काही दावेदारांचे राजकीय भवितव्य धोक्यात येण्याची चर्चा होत होती.
सरपंच पदाचे महिला आरक्षण पुढील प्रमाणे.
१) अनुसूचित जाती प्रवर्ग – वैजनाथ,फरकांडे – जानफळ
२) अनुसूचित जमाती प्रवर्ग – पिंपळकोठे बु.,पिंप्री प्र.चा.,रिंगणगांव, खर्ची बु., कासोदा,
३) ना.मा.प्रवर्ग – आडगाव,विखरण – चोरटक्की, पिंप्री बु., टोळी खु.,दापोरी,खेडी खु.
४) सर्वसाधारण प्रवर्ग – तळई ,कढोली, रवंजे बु.,भालगांव बु.- नंदगांव, जळू – पळासदळ, खडके बु.,बाम्हणे – आंबे, खडके सिम – गणेशनगर, ताडे, जवखेडे बु., खर्ची खु.,टाकरखेडे,नानखुर्द बु.,पातरखेडे,आनंदनगर.