जळगावदेश-विदेशमहाराष्ट्र

बचतगटाच्या माध्यमातून महिलांनी व्यवसाय सुरु करावेत-जिमित शेठ.

प्रतिनिधी एरंडोल – शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून बचतगटांना अर्थसहाय्य
उपलब्ध करून दिले जात असून,बचतगटांच्या माध्यमातून महिलांनी व्यवसाय सुरु
करावेत असे आवाहन स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक जिमित शेठ यांनी
केले.पंचायत समिती व स्टेट बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात
आलेल्या बचतगट महिला मेळाव्यात ते बोलत होते.मेळाव्यात महिलांना विविध
योजनांची माहिती देण्यात आली.

     यावेळी व्यवस्थापक जिमित शेठ यांनी मार्च महिन्यात बॅंकेतर्फे शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून बचतगटांना सुमारे पन्नास लाख
रुपयांचे अर्थसहाय्य उपलब्ध करून दिल्याचे सांगितले.बचतगटातील महिला सदस्यांनी विविध व्यवसाय सुरु करून स्वावलंबी बनावे असे आवाहन केले.बचतगटांच्या माध्यमातून महिलांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होत असतात याचा लाभ घेवून आर्थिक विकास करावा असे सांगितले.

महिलाआर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास संपूर्ण परिवारात बदल होत असल्याचे विविध
उदाहरणे देवून सांगितले.यावेळी व्यवस्थापक जिमित शेठ यांनी बँकेच्या अल्पदरात उपलब्ध असलेल्या विमा योजना,विम्याचे वार्षिक व सहामाही हप्ते,विम्याची उपयुक्तता,बँकेच्या विविध योजना याबाबत माहिती दिली.महिलांनी उपस्थित केलेल्या विविध समस्यांचे निराकरण त्यांनी केले
तसेच विविध योजनांची महिलांनी जाणून घेतली.पंचायत समितीचे गुलाब चव्हाण
यांनी बचत गटांसाठी शासनाच्या असलेल्या विविध योजना,बचतगटांमुळे महिलांच्या आयुष्यात होणारे बदल,महिलांचे होणारे सशक्तीकरण याबाबत मार्गदर्शन केले.मेळाव्यास बँकेच्या सेवा प्रबंधक श्रीमती श्रद्धा सबनीस,कर्ज वितरण विभागाचे गणेश चौधरी,आनंद सिंग,प्रसाद भदाणे यांचेसह कर्मचारी,महिला बचतगटाच्या सदस्या उपस्थित होत्या.बँकेचे कर्मचारी व
महिला बचत गटाच्या पदाधिका-यांनी मेळाव्यासाठी सहकार्य केले.मेळाव्यास
महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.मेळाव्यातील विविध विषयांवरील मार्गदर्शनामुळे शासनाच्या विविध योजनांची तसेच बँकेच्या विमा योजनांची
माहिती मिळाल्याची प्रतिक्रिया उपस्थित महिलांनी व्यक्त केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button