ताज्या बातम्यादेश-विदेशमहाराष्ट्र

विभागीय आयुक्त यांच्या आदेशाची पायमल्ली

प्रतिनिधी पैठण : येथील तहसील कार्यालय  प्रतिनियुक्तीवर असलेले शिक्षक श्री रेवन्नाथ खेडकर यांना कार्यमुक्त  करण्यात आलेले नाही .
  श्री रेवन्नाथ खेडकर पदवीधर प्राथमिक शिक्षक जि प प्रा शा मायगाव केंद्र आपेगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत आहेत ते लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीपासून आज पर्यंत तहसिल  कार्यालयात प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत. लोकसभा व विधानसभा दोन्ही निवडणुकीचे कामकाज संपलेले आहे याबाबत अनिता वानखडे यांनी श्री रेवन्नाथ खेडकर यांचे वेतन थांबवण्याचे व शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी तक्रार  करुन योग्य ती कारवाही न झाल्यास गटशिक्षणाधिकारी कार्यालय समोर आंदोलन करण्यात येईल. कार्यालयासमोर आंदोलनास बसल्यास व त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास गटशिक्षणाधिकारी कार्यालय जबाबदार राहणार नाही.

श्री रेवन्नाथ खेडकर यांना कार्यमुक्त करावे असे पञ गटशिक्षणधिकारी यांनी तहसिलदार यांना दिले आहे माञ तहसिलदार हे हम करे सो कायदा अशा जोरात आहेत . तहसिल मध्ये शिक्षक आता काय विघार्थी सोडुन तहसिल मधील कर्मचारी यांना ज्ञानाचे धडे देत आहेत का हा नागरिकांना पडलेला प्रश्न आहे

*चौकट*

शासन निर्णय, ग्राम विकास व पंचायत राज विभाग, शासन निर्णय जा.क्र. प्रतिनि-२००६/प्र.क्र. ३९०/आस्था-९, दि.२७ जून, २००६
परिपत्रक जा.क्र. २०१९/विशा-आस्था/मविसे-२/बदल्या कावि, दि.०६ मार्च, २०१९.
जा.क्र.२०२३/जि.प/आस्था-२/प्रतिनियुक्त्या/कावि-२६१ दि.०९/१०/२०२३.
आदेश
प्रशासकीय दृष्टीने प्रतिनियुक्त्या विभागीय आयुक्तांचे पूर्व परवानगी करण्याबाबतचे निर्देश आहेत. तथापि, विभागीय आयुक्तांची मान्यता न घेता परस्पर प्रतिनियुक्त्या केल्याच्या तक्रारी प्रस्तूत कार्यालयास प्राप्त होत आहे.
विभागीय आयुक्तांच्या परवानगी शिवाय केलेल्या सर्व प्रतिनियुक्त्या रदद करुन ७ दिवसांचे आंत अशा कर्मचाऱ्यांना तात्काळ मुळ जागी पाठविण्यात यावे. असे आदेश
सुरेश बेदमुथा उप आयुक्त (आस्थापना) विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेले आहेत असे असतांना तहसिलदार त्या कर्मचारी यांना पद मुक्त करत नाहीत म्हणजे विभागीय आयुक्त यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली आहे असे लिहल्यास गैरनाही.

*चौकट*

कार्यमुक्त करण्यासाठी अर्ज सादर केला आहे तरी देखील मला अद्यापही कार्यमुक्त केले नाही

*रेवन्नाथ खेडकर*
शिक्षक


*चौकट*

आम्ही पत्रव्यवहार करून देखील तहसीलदार आमच्या शिक्षकाला कार्यमुक्त करत नाही

*गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button