देश-विदेशमहाराष्ट्र

नाताळ निमित्त डिवाइन मर्सी चर्चची संदेश फेरी


विशेष प्रतिनिधी पुणे : वडगावशेरी येथील डिवाइन मर्सी चर्च येथे नाताळ पूर्व सणाची तयारी म्हणून संदेश रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
       ब्रह्मसन सिटी, हॉटेल ग्रीन थिंग, भाजी मंडई, स्टेला मारीस हायस्कूल, आनंद पार्क  आशा मार्गावरून संदेश देणाऱ्या खुल्या गाडीत बाळ येशु दर्शनाचा हलता देखावा दाखवून भाविकांना नाताळ व नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
         या प्रसंगी प्रार्थना, गायन,  नृत्य, असा जल्लोष करण्यात आला. मोठ्या प्रमाणात  चिमुरड्यांसह, आबाल वृद्ध, भाविक, तरुण संघ यात सहभागी झाले होते.
             चर्च चे प्रमुख धर्मगुरू फादर.अल्फ्रेड मीरांडा, शिवा तांबे, सर, फादर. संदीप सोनवणे, अब्राहम आढाव यांनी नाताळ निमित्त भाविकांना संदेश दिला. खुल्या गाडीला विद्युत रोषणाईची सजावट आणि ध्वनीवर्धक लावण्यात आले होते. ख्रिसमस कॅरल, सांताक्लॉज यांनी अबाल वृद्ध आणि चिमुरड्यांना खाऊचे वाटप केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
        या प्रसंगी वडगावशेरीचे माजी नगरसेवक संदीप जराड, स्टेला मारीस हायस्कूलच्या प्राचार्या सिस्टर.आर्कंन फर्नांडिस उपस्थिती होते.
सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पारधे, समीर लोखंडे, संजय तांबे, श्याम हिवाळे तसेच  विविध ठिकाणचे धर्मगुरू, धर्म भगिनी, भाविक मोठ्या संख्येने हजर होते.
      या प्रसंगी समितीने विशेष जबाबदारी सांभाळली. रात्री दहा वाजता कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. फादर.आल्फ्रेड, यांनी उपस्थित सर्वांना शुभेच्छा  देऊन आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button