सकल हिंदू समाज तर्फे आयोजित आक्रोश मोर्च्यात मोठ्या संख्येत नागरिक सहभागी……!

एरंडोल प्रतिनिधी – जम्मू काश्मीर मध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात २८ भारतीय पर्यटक मृत्यूमुखी पडले.हिंदूंवर झालेल्या या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ एरंडोल येथे २८ एप्रिल २०२५ रोजी सकल हिंदू समाजातर्फे ‘ शहर बंद ‘ चे आवाहन करण्यात आले होते.या आवाहनास प्रतिसाद देत सर्व पक्षीय नेत्यांसह नागरिकांनी माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा निषेध व्यक्त करत सकाळी १०.३० वाजता पांडववाडा येथून निघालेल्या जनआक्रोश मोर्च्यात सहभागी होऊन १००% कडकडीत बंद पाळण्यात आला.एरंडोल बंदला प्रतिसाद देत शहरातील सर्व व्यापारी संकुल व बाजारपेठ सकाळपासूनच पुर्णपणे बंद होती.
यावेळी सकल हिंदू समाजातर्फे काढलेल्या जन आक्रोश मोर्च्यात सर्व पक्षीय कार्यकर्ते,नेत्यांसह मोठ्या संख्येने महिला व नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.याप्रसंगी नागरिकांनी दहशतवाद्यां विरोधात घोषणा दिल्या.सदर जन आक्रोश मोर्चा पांडववाडा येथून निघून भोई गल्ली,बाखरूम बाबा, भगवा चौक,मेनरोड, बुधवार दरवाजा,मरिमाता मंदिर, म्हसावद नाका पासून प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला.याठिकाणी प्रांताधिकारी कार्यालयासमोर पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिक व सैनिकांना श्रद्धांजली वाहत दहशतवाद्यांचा पुतळा जाळून घटनेचा निषेध व्यक्त केला.
यावेळी हल्ला करणाऱ्या पाकिस्तानचा व दहशतवाद्यांना अद्दल घडवण्याची एकमुखी मागणी करण्यात आली.
या जन आक्रोश मोर्च्यात प्रसाद दंडवते,माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, दशरथ महाजन, रविंद्र महाजन,विजय महाजन, रमेश महाजन, शालिग्राम गायकवाड, . डॉ सुरेश पाटील,राजेंद्र चौधरी, किशोर निंबाळकर, जगदीश ठाकूर,डॉ.नरेद्र पाटील, जगदीश पाटील, राजेंद्र महाजन, डॉ.प्रशांत पाटील,आर.डी.पाटील,कृष्णा महाजन, जयश्री पाटील, रश्मी दंडवते,शोभा साळी,दर्शना तिवारी आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
सकाळपासून संध्याकाळपर्यत शहरातील मेनरोड, फुले आंबेडकर व्यापारी संकुल, बसस्थानक परिसर,म्हसावद नाका परिसर, छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल, साने गुरुजी व्यापारी संकुल या प्रमुख ठिकाणी दिवसभर शुकशुकाट दिसून आला.मात्र या बंद मधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले होते.
तसेच अतिरिकेच्या भूमिकेत अनील महाजन होता
यावेळी पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.