जळगावमहाराष्ट्र

दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात – पाय बसविण्यासाठी शिबीराचे आयोजन……

दिव्यागांना कृत्रिम हात – पाय उपलब्ध करून देणे हे ईश्वरीय कार्य…… !   ॲड .किशोर काळकर
प्रतिनिधी – सक्षम देवगिरी प्रांत व सुखकर्ता फाउंडेशन आयोजित एरंडोल येथील शिबिरात
५० दिव्यांग व्यक्तींना मिळाला तात्काळ लाभ !
या बाबत सविस्तर वृत्त असे की, सक्षम देवगिरी प्रांत , केशवस्मृती प्रतिष्ठान , एस . आर .ट्रस्ट , समाजकल्याण विभाग जळगाव आणी ALIMCO ह्यांच्या विद्यमाने व एरंडोल येथील सुखकर्ता फाउंडेशन च्या सहकार्याने दिनांक २९ एप्रिल रोजी एरंडोल येथील चोधरी समाज मंगल कार्यालयात आयोजित
” दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात पाय बसविणे व कॅलिपर्स ह्याचे मोजमाप करून तत्काळ ( ऑन द स्पॉट ) वितरण करण्यात आले. शिबिराच्या उद्धाटन प्रसंगी ॲड . किशोर काळकर ( महाराष्ट्र भाजपा जनजातीय क्षेत्रीय संपर्क प्रमुख ) ह्यांनी शारीरिक व्याधी किंवा अपघाताने शारीरिक व्यंगत्व आलेल्या दिव्यांगाकडे , त्यांच्या अडचणींकडे समाजाचा , प्रशासनाचा बघण्याचा दृष्टिकोन जो पूर्वी होता तो बदलत असल्याचा सकारात्मक परिणाम सद्यःस्थितीत दिसून येत असल्यामुळे दिव्यांगांमध्ये उपजतच असलेल्या आत्मविश्वासाला बळ देण्याचे मानवतावादी व ईश्वरीय कार्य करणाऱ्या सक्षम देवगिरी प्रांत व सुखकर्ता फाउंडेशनचे कार्य हे प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन ह्या प्रसंगी केले .
शिबिराच्या प्रारंभी पहेलगाम , जम्मू काश्मीर येथील नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निरपराध पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली अपर्ण करण्यात आली .
प्रास्ताविकात सुखकर्ता फाउंडेशनचे डॉ नरेंद्र ठाकूर ह्यांनी दिव्यांगाच्या ह्या आरोग्य शिबीराचे एरंडोल येथील नियोजन करण्याचे भाग्य मिळत असल्याचा उल्लेख करत आगामी काळात हि सक्षम सारख्या संस्थां सोबत दिव्यांगांसाठी कार्य करण्यासाठी उत्सुक असल्याचे नमूद केले .
ह्या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी सक्षम देवगिरी प्रांत चे उपाध्यक्ष , ह्या उपक्रमाचे प्रभारी प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉ .धमेंद्र पाटील ह्यांनी जळगाव जिल्ह्यातील अकरा ठिकाणी अश्या शिबिरांचे आयोजन पार पडले असून पाचशेच्या वर दिव्यांग व्यक्तींनी ह्याचा लाभ झालेला असल्याचे नमूद करून आगामी काळात असेच विविध शिबीरांच्या आयोजनाबरोबरच सक्षम , देवगिरी प्रांत ह्या संस्थेमार्फत दिव्यांगांसाठी शासकीय योजना खेड्यापाड्यातील गरजूपर्यंत पोहोचविण्यासाठी कटीबध्द असल्याचे नमूद केले .
सक्षम , देवगिरी प्रांत च्या जिल्हाध्यक्षा मीनाक्षीताई निकम ह्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी अपंगाऐवजी दिव्यांग ह्या शब्दप्रचारा च्या वापरा मागील समर्पक भूमिका नमूद करून स्थानिक आयोजकांचे मनपूर्वक आभार मानले .
सक्षम देवगिरी प्रांत जिल्हा कोषाध्यक्ष डॉ . राहुल मयूर , सक्षम चे जिल्हा प्रकोष्ट पदमाकर इंगळे ह्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते .
एरंडोल नगरीचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश परदेशी , माजी नगराध्यक्ष राजेंद्र चोधरी , एरंडोल तालुका वैद्यकीय संघटने चे अध्यक्ष डॉ सुधीरजी काबरा ,माजी नगराध्यक्ष रवीन्द्र महाजन ,रमेशअण्णा महाजन , माजी उपनगराध्यक्ष शालिकभाऊ गायकवाड , जगदीश पाटील , माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉ सुरेश पाटील , डॉ राजेंद्र चोधरी, माजी उपनगराध्यक्ष सौ छायाताई दाभाडे , माजी उपनगराध्यक्ष श्री अशोक चोधरी ,आनंद दाभाडे, माजी उपनगराध्यक्ष संजय चोधरी , सुभाष पाटील ह्या मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती .
उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी नगरसेवक डॉ नरेंद्र पाटील ह्यांनी केले तर आभार सुखकर्ता फौंडेशनच्या अध्यक्षा , माजी उपनगराध्यक्षा डॉ गीतांजली ठाकूर ह्यांनी मानले .
डॉ किरण पाटील , डॉ पांडुरंग पिंगळे , निलेशभाऊ परदेशी , विवेक ठाकूर डॉ मकरंद पिंगळे , डॉ राहुल वाघ , डॉ अमोल बोरनारकर , प्रो . डॉ विजय शास्त्री , विशाल सोनार , नितीन पाटील सर , प्रदीप फराटे , राजूभाऊ चोधरी ,धनंजय खैरनार , सुनील चोधरी , प्रमोद पाटील , सागर ठाकूर, योगेश महाजन , पिंटू माळदे, यशवंत बुंदेले ह्यांसह अनेक मान्यवरांची ह्या प्रसंगी उपस्थिती होती .
विशेष म्हणजे शिबिरातच तत्काळ मोजमाप घेऊन लगेचच कृत्रिम हात व पाय बसवून प्रत्यक्ष वापराचे प्रात्यक्षिक अजमावून घेत असल्यामुळे गरजू लाभार्थ्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद ह्या वेळी दिसून येत होता . ५० दिव्यांग व्यक्तींनी ह्या शिबिराचा लाभ घेतला व त्याच ठिकाणी लगेचच त्यांना कृत्रिम हात – पाय व कॅलिपर्स , शूज ह्याचे वितरण करण्यात आले .
शिबीर यशस्वीतेसाठी सुखकर्ता फाउंडेशनचे शेखर बुंदेले , राहुल शिंदे ,यश बुंदेले , किसन गवळी , पवन गवळी , वासिम शेख ह्यांनी परिश्रम घेतले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button