१५७ वर्ष पुरातन नगर वाचनालय एरंडोल यांची विशेष सर्वसाधारण सभा संपन्न…..

प्रतिनिधी – एरंडोल शहरातील १५७ वर्ष पुरातन नगर वाचनालय एरंडोल यांची विशेष सर्वसाधारण सभा संस्थेचे कार्याध्यक्ष अँड.किशोर भाऊ काळकर यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
यावेळी संस्थेची ग्रंथपाल संतोष वंजारी यांनी मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून मंजूर केले. सभेच्या सुरुवातीला संस्थेचे माजी पंतप्रधान, माजी अध्यक्ष, सभासद व दिवंगत नेते व कुंभमेळ्यात मृत्युमुखी पडलेल्या भाविकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नंतर विषयानुसार संस्थेची सन 2024 25 व सन 2025 26 या दोन वर्षाकरिता नगर वाचनालयाची नूतन कार्यकारणी एकमताने मंजूर करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ देविदास ठाकूर, कार्याध्यक्ष प्रा. वासुदेव नामदेव आंधळे, चिटणीस रवींद्र चिंतामण लाळगे, सरचिटणीस संतोष वेडू वंजारी, संचालक किशोर मार्तंडराव काळकर, गुरुप्रसाद तुकाराम पाटील, जाधवराव भीमसेन जगताप, प्रवीण आधार महाजन, परेश किशोर बिर्ला, डॉ. प्रेमराज गंगाधर पळशीकर, अमोल अशोक काबरा, रवींद्र प्रभाकर सोनार, सुदर्शन मधुकर देशमुख, ग्रंथपाल देवेंद्र संतोष वंजारी, लिपिक संजय बाळकृष्ण अग्निहोत्री, शिपाई श्री गोकुळ अरुण मोरे उपस्थित होते. या वेळी नुतन कार्यकारिणी सदस्यांचे सर्वांनी अभिनंदन केले.