जळगावमहाराष्ट्र
मधूकर नगर येथे बंद घरात चोरांनी मारला डल्ला……

प्रतिनिधी – एरंडोल येथील मधूकर नगर मधील रहिवासी प्रभाकर कृष्णाजी कुलकर्णी हे नंदूरबार येथे आपल्या मुलाकडे गेले असता दि. १८ फेब्रुवारी रोजी रात्री १.१५ वाजेच्या सुमारास चोरांनी घराच्या मागील बाजूने सेंट्रींग कामाच्या पाटीच्या साह्याने भिंती वर चढून आत प्रवेश करून पुढील दरवाजा तोडून अंदाजे २० ते २५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेमुळे कॉलनीत राहणाऱ्या नागरिकांमध्ये घबराहट पसरली असून कॉलनीतील रहिवाशीयांनी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी सुद्धा केली आहे.
याबाबत ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी एरंडोल पो. स्टे.ला तक्रार दाखल केली असून पूढील तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहे.