आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन” अध्यक्ष जितेंद्र पाटील यांना शिवमुद्रा पुरस्कार

एरंडोल (प्रतिनिधी) : पहिला दिवा त्या देवाला, ज्याच्या मुळे मंदिरात देव शिल्लक आहे… छत्रपती शिवाजी महाराज! या प्रेरणादायी विचाराने कार्य करणाऱ्या शिवमुद्रा प्रतिष्ठान महाराष्ट्र तर्फे समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना “शिवमुद्रा पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय आणि समाजोपयोगी कार्य केल्याबद्दल आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. जितेंद्र पाटील यांना “शिवमुद्रा पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले. आरोग्य जनजागृती, रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, तसेच गरजू रुग्णांना मदत या उपक्रमांमुळे त्यांनी समाजात आरोग्यविषयक जागरूकता निर्माण केली आहे.
या प्रसंगी प्रतिष्ठानचे पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते. सन्मान मिळाल्याबद्दल जितेंद्र पाटील यांनी सांगितले की, “हा पुरस्कार माझ्या टीमच्या अथक परिश्रमांचे फलित असून, यानंतर अधिक जोमाने आरोग्य सेवेसाठी कार्य करणार आहे.”
शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.