जळगावमहाराष्ट्रशैक्षणिक

न्यू इंग्लिश मीडियम स्कूल एरंडोल दहावीच्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

प्रतिनिधी – एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूल चा मार्च 2025 ला झालेल्या माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागलेला असून यावर्षी शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवलेला त्यात श्रुती नितीन वाणी व सिद्धी ज्ञानेश्वर कोळी या दोन विद्यार्थ्यांनीनी 93.40% मिळून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे .तर रणवीर पंढरीनाथ बोरसे यांने 92 .20% मिळून द्वितीय क्रमांक, वेदिका दीपक पाटील 91.80 मिळवून तृतीय क्रमांक, आदिती जगन सपकाळे, जयश्री किरण महाजन प्रणिता उत्तम पाटील यांना 90 टक्केंच्या च्या पुढे गुण मिळाले आहे. शाळेतील दहा विद्यार्थी यांनी 90 टक्क्यांच्या वर गुण मिळाले आहेत तर बाकी विद्यार्थी ही 80 प्लस आहेत या यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शाळेचे प्रिन्सिपल हॅरी जॉन सर वाईस प्रिन्सिपल सरिता पाटील शाळेतील सर्व विषय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य लाभले या गुणवंत विद्यार्थ्यांचं कौतुक व अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्रजी काबरा व संचालक मंडळ, शाळेतील प्रिन्सिपल, सर्व शिक्षकांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button