कासोदा येथे ऑपरेशन सिन्दुर च्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिर संपन्न.

प्रतिनिधी – एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे नुकतेच ऑपरेशन सिन्दुर च्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिर घेण्यात आले.यावेळी सुमारे १०४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.यात महिलांची संख्या लक्षणीय होती.
कासोदा येथील स्वामी समर्थ केंद्रात दि.१६ मे रोजी सकाळी ९ वाजेपासून रक्तदान शिबिर सुरु झाले.याप्रसंगी सुमारे १०४ रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच यावेळी महिलांची संख्या लक्षणीय होती. एरंडोल तालुक्यातील बांभोरी खु.येथील शिक्षक तुषार वडगावकर यांच्या पत्नी अश्विनी वडगावकर व त्यांचा १८ वर्षाचा मुलगा कौस्तुभ वडगावकर यांनी सुरुवातीला सोबत रक्तदान केले.याप्रसंगी माजी सचिव मुंबई मंत्रालय म.राज्य व रेडक्रॉस च्या संचालिका ॲड. मंगला ठोंबरे,जळगाव रेडक्रॉसच्या पी.आर.ओ.उज्वला वर्मा,जी. प.निवृत्त डी.एच. ओ.व रेडक्रॉस चे वैद्यकीय अधिकारी डॉ.शंकरलाल सोनवणे,रेडक्रॉस चे संचालक डॉ.नरेंद्र ठाकुर व त्यांचे सहकारी राजेंद्र कोळी,सीमा शिंदे,मंगेश ओतारी,संजय साळुंखे व गावकऱ्यांनी परिश्रम घेतले.याप्रसंगी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद पाटील,माजी जि.प.सदस्या महानंदा पाटील,राहुल चौधरी,राहूल सोनवणे,महेश पाटील,सरीता मंत्री,उज्वला झंवर,उज्वला वर्मा,मंगला ठोंबरे,शैलेश पांडे,बापू सोनवणे,राहूल मराठे आदी उपस्थित होते.