एरंडोल येथे भारतीय जनता पार्टीची बैठक संपन्न.

प्रतिनिधी – एरंडोल येथील शासकीय विश्रामगृह येथे भारतीय जनता पार्टीची बैठक संपन्न झाली. संघटनेत बदल झाल्यानंतर ही पहिलीच बैठक होती.जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली.
सदर बैठकीमध्ये ऑपरेशन सिंदूरला अनुसरून तिरंगा रॅली काढणे,आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीसंदर्भात, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती साजरी करण्याबाबत तसेच पक्ष संघटन मजबूत करून पक्ष बळकट करण्यासाठी उपाय योजना या विषयांवर जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी माजी आमदार महेंद्रसिंग पाटील,एरंडोलचे लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश परदेशी, माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, माजी नगराध्यक्ष रवींद्र महाजन,माजी नगरसेवक सुनील भैया पाटील,माजी तालुकाध्यक्ष एस.आर.पाटील, जिल्हा चिटणीस निलेश परदेशी, शहराध्यक्ष नितीन महाजन,महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पल्लवी पाटील,भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष मीनाक्षी पाटील,महिला मोर्चा शहर अध्यक्ष प्रतिभा पाटील, धरणगावचे संजय महाजन, पराग पवार, प्रमोद महाजन, माजी नगरसेवक श्याम ठाकूर,माजी नगरसेवक डॉ. नरेंद्र ठाकूर, युवा मोर्चा शहराध्यक्ष दिपक पाटील, छोटू भगत,महारु पाटील, जिल्हा उपाध्यक्ष भिका कोळी,सचिन विसपुते, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस पिंटू राजपूत,बाजीराव पांढरे, गोपाल महाजन,गजू महाजन,संदीप पाटील (बोडरे),अजित पाटील, भगवान मराठे,मधुकर देशमुख,नाना देसले, निखिल सूर्यवंशी,कल्पेश महाजन तसेच संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.