जळगावमहाराष्ट्र

राष्ट्रीय महामार्गावरील शहरांच्या चुकीच्या नावाचे फलक बदलून नवीन फलक बसवण्याबाबत दिले निवेदन.

प्रतिनिधी – एरंडोल राष्ट्रीय महामार्गावर लावण्यात आलेले गावांच्या नावाचे दिशादर्शक फलक (साइनबोर्ड) चुकीचे नमूद करण्यात आले आहेत. एरंडोल शहराचे नाव एरंडोळ आणि पद्मालय चे नाव पद्माळय असे नमूद करण्यात आले असून यासाठी योग्य नाव बदलण्यासाठी ॲड. आकाश महाजन यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे निवेदन दिले आहे.
निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की एरंडोल शहर हे धुळे आणि जळगाव दरम्यान आहे. शहराचा इतिहास पांडव काळापासून आहे आणि महाभारताच्या पुस्तकातही शहराचा उल्लेख आहे. प्राचीन काळात या गावाचे नाव “एकचक्र नगरी” असल्याचे पुरावे असल्याचे म्हटले असून अज्ञात काळात पांडव येथे शहरातील पांडववाड्यात राहत असल्याचे बोलले जात असल्याचे म्हटले आहे.श्री.क्षेत्र पद्मालय हे शहरापासून १५ किमी अंतरावर एक प्राचीन गणपती मंदिर असलेले तीर्थ क्षेत्र असून सदर मंदिराचा इतिहास देखील पांडव काळापासूनचा असून या सर्व गोष्टी लक्षात घेऊन, शहरवासीयांची आवड आणि श्रद्धा “एरंडोल” आणि “पद्मालय” या दोन्ही प्राचीन क्षेत्रा बद्दल असल्याचे म्हटले आहे तसेच याच नावाने आमचे शहर देशभरात ओळखली जातात.आमच्या दोन्ही गावांचा उल्लेख सर्व शासकीय निमशासकीय रेकॉर्डवर, फलक आणि अगदी गुगल मॅपवर “एरंडोल” आणि “पद्मालय” असा केला असल्याचे म्हटले आहे. दरम्यान आपल्या विभागामार्फत या दोन्ही गावांच्या नावात चूक झाल्याबद्दल आमच्या भावना दुखावल्या जात असून बाहेर गावावरून येणाऱ्या प्रवाशांना,वाहन चालकांना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे म्हटले असून शेवटी सदर चुकीची नोंद घेऊन आणि आमच्या शहराचे नाव “एरंडोळ” ऐवजी “एरंडोल” आणि “पद्माळय” ऐवजी “पद्मालय” असे बदल करुन लवकरात लवकर नवीन बोर्ड स्थापित करावे अशी मागणी करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button