जळगावमहाराष्ट्रराजकारण

*एरंडोल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य नोंदणी अभियान,नवीन सभासदांचा उत्स्फुर्तपणे प्रतिसाद …..!*

एरंडोल  प्रतिनिधी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी मोहिम यशस्वीरित्या राबविण्याचे पक्षश्रेष्ठींनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना केले आहे.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबर असेल,असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.
        त्या अनुषंगाने जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष संजय पवार, किसान सेल जिल्हाप्रमुख ईश्वर पाटील, जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष योगेश देसले यांच्या मार्गदर्शनाखाली एरंडोल तालुका शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सेल यांच्या तर्फे तालुक्यात व शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सदस्य नोंदणी अभियान घेण्यात आले.यावेळी एरंडोल शहर, विखरण, उमरदे,खर्ची,रवंजा, खडके, पद्मालय, नागदुली,चुटकी,आडगाव,तळई मालखेडा, एरंडोल मधील विखरण रोड, भवानीनगर, हनुमान नगर, उत्तम नगर, केवढी पुरा या भागात सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले.त्यात मोठ्या संख्येने नवीन सभासदांची नोंदणी करण्यात आली.वरील सर्व भागात पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानास उत्तम प्रतिसाद मिळाला.
          याप्रसंगी जळगाव जिल्हा किसान सेलचे जिल्हाप्रमुख ईश्वर पाटील,एरंडोल तालुका अध्यक्ष अमित पाटील,माजी नगरसेवक डॉ.सुरेश पाटील,एरंडोल तालुका किसान सेल अध्यक्ष राजेंद्र चौधरी,किशोर भाऊ पाटील खर्ची, मुकुंद भाऊ ठाकूर विखरण, दिनेश महाजन रिंगणगाव, मनोज पाटील रिंगणगाव,सुनील मोरे खडके खुर्द, प्रदीप सोनवणे,शेख कलीम एरंडोल, दिपक पाटील मालखेडा, शेख मुजमबिल कासोदा, शेख शोएब कासोदा,जयराम पाटील उमरदे, सतीश पाटील खेडी,अभयसिंग पवार तांडा, कैलास सोनवणे बामणे,सागर भोई भवानीनगर, समीर खाटीक फकीर मोहल्ला, शंकर नाईक केवढीपुरा,सुनील महाजन विखरण रोड, बापू दयाराम महाजन विखरण रोड,उत्तम नगर रामसिंग पावरा,करण नाईक पद्मालय, उत्तम नाईक पद्मालय, अर्जुन गायकवाड तळई, इजाज खाटीक नांदोली,प्रभाकर नाईक आडगाव यांनी सदस्य नोंदणी अभियान यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button