जळगावमहाराष्ट्र

एरंडोल शहर संघर्ष समितीतर्फे  न्यायाधीश भक्ती तळेकर यांचा विशेष गौरव


प्रतिनिधी एरंडोल – शहर संघर्ष समितीतर्फे आज जागतिक महिला‌ दिनानिमित्त एरंडोल न्यायालयाच्या सह दिवाणी न्यायाधीश भक्ती तळेकर व एडवोकेट दिपाली खैरनार यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन समितीचे अध्यक्ष रवींद्र लाळगे व उपाध्यक्ष नामदेवराव पाटील यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. यावेळी मुख्य न्यायाधीश एकनाथ चौगुले यांचादेखील शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. वकील संघाच्या अध्यक्षपदी एडवोकेट मनोहर महाजन व सचिव पदी आकाश महाजन यांची निवड झाल्याबद्दल संस्थेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास संघर्ष समितीचे एडवोकेट दिनकरराव पाटील, नाना भाऊ देवरे, तुकाराम पाटील, शिक्षक स्वप्निल सावंत, रघुनाथ कोठावदे, प्रमोद महाजन, सीनियर एडवोकेट आल्हाद काळे, जे जी पाटील, रमेश दाभाडे, ए टी पाटील, ज्ञानेश्वर महाराज,प्रेमराज पाटील,अहमद सय्यद, सुजय पाठक, माजी सरपंच निंबा कंखरे आदि यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रवीण महाजन यांनी तर आभार एडवोकेट आकाश महाजन यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button