*भोई समाजाचे आराध्य दैवत श्री संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात साजरी*

एरंडोल प्रतिनिधी – सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा २५ मे २०२५ रोजी श्री बिजासनी भोईराज युवाशक्ती बहुउद्देशीय संस्थेमार्फत भोई समाजाचे आराध्य दैवत श्री संत भीमा भोई यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.या जन्मोत्सव प्रसंगी गोदावरी फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत भव्य आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.तसेच सायंकाळी ६ वाजता भव्य मिरवणुकीचे आयोजन देखील करण्यात आले.या सोहळ्याप्रसंगी जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे यांचे स्वागत संस्थेचे जेष्ठ सल्लागार चुडामन आप्पा भोई यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्या मुंबई फेडरेशन उपाध्यक्ष यांचे स्वागत श्री बिजासनी भोईराज युवाशक्ती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष योगेश चुडामन भोई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष योगेश देसले यांचे स्वागत संस्थेचे सल्लागार शिवाजी जगन्नाथ भोई यांच्या हस्ते करण्यात आले.माजी महापौर ललित भाऊ कोल्हे यांचे स्वागत संस्थेचे सचिव अशोक भोई यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याप्रसंगी समाजाचे जेष्ठ पदाधिकारी उत्तम भोई, घनश्याम भोई,भिकन जावरे,मिलिंद भोई, संजू जावरे,संजय मगन भोई,राजू भोई,याप्रसंगी समाजाचे सर्व जेष्ठ पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेश शिवाजी भोई तर आभार प्रदर्शन गिरीश घनश्याम भोई यांनी केले.या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित भोई समाज जिल्हा उपाध्यक्ष हर्षल भोई,संस्था उपाध्यक्ष स्मितेश जावरे,संस्था सचिव रूखमणी शिवाजी भोई,संतोष जावरे,रंजीत भोई,धर्मराज जावरे,महेश भोई,नवल भोई,नितीन भोई,जीवन तायडे,गणेश सोनार,जानकीराम भोई,विपुल कोळी,मुकेश जावरे,नरेंद्र भोई, राजू राणे आदी सर्व समाजाचे व संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.