जळगावदेश-विदेशमहाराष्ट्र

महसूल विभागातर्फे महसूल पंधरवाडा साजरा.

प्रतिनिधी – एरंडोल महसूल विभागातर्फे शासन निर्णय दिनांक ०१ सप्टेंबर २०२५ अन्वये महाराष्ट्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार दिनांक १७ सप्टेंबर २०२५  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म दिन ते राष्ट्रपिता महात्मा गांधी याची जयंती दिनांक ०२ ऑक्टोंबर २०२५ या कालावधीमध्ये महसूल पंधरवाडा साजरा करण्याचे आदेशीत करण्यात आलेले आहे.त्यानुसार एरंडोल तालुक्यात दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी संपुर्ण ५२ ग्रामपंचयातीमध्ये ग्राम सभेचे आयोजन करण्यात आलेले होते.सदर ग्राम सभेमध्ये प्रपत्र-१ व प्रपत्र-२ मध्ये पाणंद अतिक्रमीत रस्त्यांची यादी तयार करुन त्याचे वाचन ग्राम सभेमध्ये करण्यात आले तसेच तालुक्यातील सर्व ६५ गावांमध्ये शेत रस्ते शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले शिवाय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान कार्यक्रमाचे प्रक्षेपण सर्व ग्रामस्थ यांना दाखविण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी जळगांव यांचे महसुल सेवा पंधरवाडा व पंचायत राज अभियानबददलचे आवाहन देखिल ग्रामस्थांना दाखविण्यात आले. मौजे पिंपळकोठे बु व उमरदे या ठिकाणी तहसिलदार प्रदीप पाटील यांनी ग्राम सभेला उपस्थित राहून महसूल पंधरवाडा दिनांक १७ सप्टेंबर २०२५ ते ०२ ऑक्टोंबर २०२५ या कालावधीमध्ये महसूल विभागा मार्फत नागरीकांना व शेतकरी वर्गाला पुरविण्यात येणा-या सुविधांबाबत मार्गदर्शन केले.
मौजे उमरदे येथिल ३१ घरकुल लाभार्थी व जवखेडेसिम येथिल १० लाभार्थी यांना जागा वाटपा बाबत ७/१२ व ग्राम पंचायत गाव नमुना नं.८ चे वाटप करण्यात आले.एरंडोल तालुक्यात आज दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी एकूण ०५ ग्राम पंचायत वनकोठे, पिंप्री बु, कढोली, टोळी व सावदे प्र.चा या ठिकाणी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
        याप्रसंगी निवासी नायब तहसीलदार संजय घुले,मंडळ अधिकारी सुनिता चौधरी,ग्राम महसूल अधिकारी अमर भिंगारे,ग्रामपंचायत अधिकारी उल्हासराव जाधव सरपंच,ग्रामपंचायत सदस्य व गावकरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button