एरंडोल येथे शिवसेनेची आमदारांच्या उपस्थितीत शिवकार्य अभियान अंतर्गत सदस्य नोंदणी बाबत आढावा बैठक संपन्न.

प्रतिनिधी एरंडोल – शिवसेनेच्या शिवकार्य अभियान अंतर्गत सुरू असलेल्या सदस्य नोंदणी बाबत एरंडोल येथे शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली.
यावेळी आमदार अमोल पाटील यांनी आढावा बैठकीस उपस्थित राहून उपस्थितांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात होणाऱ्या सर्व निवडणूकीत शिवसेनेचा भगवा फडकविण्यासासाठी युवक व महिलांचे मजबूत संघटन करण्याचे आवाहन यावेळी केले.गाव तेथे शाखा व घर तेथे शिवसैनिक हा उपक्रम राबवून एरंडोल मतदारसंघातून सर्वाधिक सदस्य नोंदणीसाठी प्रत्येकाने जबाबदारीने कर्तव्य पार पाडावे असे आवाहन केले.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील,युवासेना जिल्हाप्रमुख प्रा.मनोज पाटील (पहेलवान ) विधानसभा क्षेत्रप्रमुख सुदाम राक्षे, तालुकासंघटक संभाजी पाटील, तालुकाप्रमुख रविंद्र जाधव, मा.नगरसेवक रूपेश महाजन,बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, विठ्ठल आंधळे, गणेश मराठे ,विज्ञान पाटील,गबाजी पाटील, दादाजी पाटील, परेश बिर्ला,
दगडु चौधरी,किरण पाटील, अतुल महाजन,मा.तालुकाप्रमुख बबलु पाटील,एरंडोल शहरप्रमुख बबलु चौधरी, पुरा विभाग शहर प्रमुख बापु मराठे,अनुसूचित जाती जमाती शहर प्रमुख अमोल तंबोली,अनिल महाजन, बाळा पाटील (पहेलवान) शाम जाधव,गणेश चौधरी,प्रा. मयुर जाधव, भैय्या ठाकुर,सचिन ठाकुर,हरी ठाकुर ,सचिन पाटील, मयुर चौधरी, विक्की साळी , नरेंद्र भोई उत्तम सोनार, भैय्या लोहार, मुन्ना पाटील, गोपाल पाटील,निखिल बडगुजर , रोहित राजपूत ,चेतन मराठे, भुषण चौधरी,चंदु वाघ , मयुर मराठे , ईश्वर पाटील, मोहन सैदाणे ,युवा सेना शहर प्रमुख कृष्णा ओतारी, आनंद चौधरी, शुभम पाटील, यांचेसह शिवसेना, युवासेना आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिक, स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.