
प्रतिनिधी एरंडोल . – येथील साहित्यिक विलास कांतीलाल मोरे यांची ” चांदोबाचं घर ” ही कविता महाराष्ट्र राज्य पाठय पुस्तक निमिती मंडळाच्या बालभारती इयत्ता पहिलीच्या मराठी अभ्यासक्रमात सन 2025 – 26 पासून समाविष्ट करण्यात आली आहे .
विलास मोरे यांची ” पांढरे हत्ती काळे दात ” ही संपूर्ण कादंबरी कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ एम .ए . ( कला शाखा )अभ्यासक्रमात होती . तसेच त्यांची “धोंड्या” ही कथा प्रथम वर्ष कला या वर्गासाठी अभ्यासाला आहे . त्यांच्या ” शाळेला सुट्टी लागली रे ” या बाल कविता संग्रहास महाराष्ट्र शासनाच्या बालकवी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून त्यांच्या ” पांढरे हत्ती काळे दात ” या कादंबरीला महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार तसेच याच कादंबरीला जामनेर मसाप शाखेचा उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार अजरा , ठाणे , जळगाव , रेंदाळ – कोल्हापूर या सह अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत .
दिलीजराज प्रकाशन पुणे या प्रकाशन संस्थेने त्यांची १० पुस्तकं प्रकाशित केलेली असून रत्री वेदनेची करुण कहाणी विदित करणारी ” मुक्या विहीरीची आवाज ” ही कादंबरी नुकतीच प्रकाशित झालेली आहे .
“तिसरा डोळा ” या कांदबरीचे इंग्रजी भाषांतर प्रा . सुरेश पांडे आणि “शाळेला सुट्टी लागली रे “: बाल कविता संग्रहाचे इंग्रजी भाषांतर डॉ.एस.आर.पाटील यानी केले असून ते या पूर्वी प्रकाशित झाले आहेत.विलास मोरे यांची कथा ,कविता ,कादंबरी ,बाल कथा , बालनाट्य , बाल कादंबरी असे एकुण १६ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत . आधारवर चित्रपटात त्यांची महत्त्वाची भूमिका असून ” झाला वारा मंद ” व ” सेल्फी फोटू .” हे दोन व्हिडिओ अल्बम प्रसिद्ध आहेत .
एम.ए. ते इयत्ता पहिली अशा या पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमाच्या प्रवास असून त्यांचे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथील मराठी भाषा विभाग प्रमुख , साहित्यिक , .मानवतावादी विचारवंत डॉ . म .सू .पगारे , डॉ.एस.आर.पाटील , स्टार प्लस वरील ऐतिहासिक मालिका लेखक प्रताप गंगावणे, संगीतकार अमर देसाई, डॉ . माधव कदम , डॉ . जितेद्र गिरासे , डॉ . वासुदेव वले , प्रा . सुरेश पांडे , ॲड . मोहन बी . शुकला , वि .दा : पिंगळे, अशोक सोनवणे , डॉ . मिलिंद बागुल , प्रा जी . आर . महाजन प्रा देवबा पाटील , व विविध साहित्यिक संस्था प्रतिनिधी तसेच साहित्यिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी यांनी अभिनंदन केले .