एरंडोल येथील शासकीय विश्रामगृह येथे भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक बैठक

मंडळ तालुकाध्यक्ष पदावर योगेश देवरे यांची निवड…
प्रतिनिधी – दि. २७ एप्रिल रोजी एरंडोल येथील शासकीय विश्रामगृह येथे भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक बैठक पार पडली.आ. गिरीश भाऊ महाजन, आ. मंगेश दादा चव्हाण, जळगाव लोकसभेचे खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी, जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील ( जळकेकर महाराज ) यांच्या आदेशाने एरंडोल विखरण रिंगणगाव या मंडळ तालुकाध्यक्ष पदासाठी नवीन व यूवा नेतृत्व म्हणून एरंडोल चे माजी उपनगराध्यक्ष योगेश युवराज देवरे ( महाजन ) यांची नियुक्ती करण्यात आली तसेच सदर बैठकीस एरंडोलचे लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेशभैया परदेशी , किशोर काळकर , माजी नगराध्यक्ष दशरथ भाऊ महाजन, माजी नगराध्यक्ष राजेंद्र आबा चौधरी, माजी नगराध्यक्ष किशोर भाऊ निंबाळकर, माजी नगरसेवक सुनील भैया पाटील, एस. आर. बापू पाटील, माजी नगराध्यक्ष रवींद्रआण्णा महाजन, अशोक भाऊ चौधरी, छोटू भगत , निलेश भाऊ परदेशी, भिका कोळी, शहराध्यक्ष नितीन नाना महाजन सचिन विसपुते, अमरजितसिंग पाटील, नगरसेवक प्रमोद महाजन , पिंटू राजपूत, बाजीराव पांढरे, माजी नगरसेवक श्याम ठाकूर, ॲड .मधुकर देशमुख, संदीप बोडरे, नरेश ठाकरे, ऋषिकेश पाटील, सुनील महाजन तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. एरंडोल तालुका अध्यक्षपदी श्री. योगेश भाऊ देवरे (महाजन ) यांच्या रूपाने युवा नेतृत्व मिळाल्यामुळे संघटनेमध्ये नवीन चैतन्य व जोश निर्माण होऊन, पक्ष संघटन वाढून व पक्ष संघटन मजबूत होऊन याचा फायदा येणाऱ्या आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, व ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्येक निश्चितच भारतीय जनता पार्टीला होईल.
ह्य निवडणूक प्रक्रिया चे निवडणूक अधिकारी म्हणून उद्धवजी माळी, गोपाल भंगाळे आणि जळगाव भाजप कार्यालय मंत्री योगेश भाऊ हे होते तसेच ही बैठक नंदू महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.