*सोयगाव सहा. पोलीस निरीक्षक पंकज बारवाल निष्क्रिय*पोलीस अधीक्षकांना सकल हिंदू समाजाच्या वतीने निवेदन !

सोयगाव प्रतिनिधी – सोयगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पंकज बारवाल यांची तातडीने बदली करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे लेखी निवेदन सकल हिंदू समाज संघटनेचे वतीने पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांना देण्यात आले आहे.
सोयगाव तालुक्यात गोवंश वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे, त्याबरोबर गोवंश वाहतुकीवर कार्यवाही न करता सामान्य नागरिकांवरच दबावाखाली कारवाई करून त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यात भर म्हणून दररोज रात्री शहरासह तालुक्यातील गावात अनेक ठिकाणी गुरे चोरीचे प्रमाण वाढले आहे. यासह सहायक पोलिस निरीक्षकांच्या हलगर्जीपणामुळे अवैध धंदे चालवणारे देखील डोके वर काढू लागलेले आहे. त्यामुळे संबंधित पोलीस अधिकारी पंकज बारवाल हे निष्क्रिय असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. सोयगाव सारख्या मागासलेल्या तालुक्यात हे पोलीस अधिकारी यांचे वर्तन अशोभनीय आहे. असेही पोलीस अधीक्षक डॉ विनयकुमार राठोड यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे. त्यांची तातडीने उचलबांगडी करावी अन्यथा सोयगाव पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर शिवसेना अध्यात्मिक सेना जिल्हाप्रमुख कडूबाळ महाराज गवादे उपजिल्हाप्रमुख पारस महाराज जैन, विद्यानंद महाराज मुरुडेश्वर संस्थान, सचीन चौधरी,ज्ञानेश्वर पाटील, ईश्वर सपकाळ, कौशल पाटील ,संतोष गायकवाड ,शुभम पाटील ,रवी पाटील आदींची स्वाक्षऱ्या आहे.