*बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या न्याहळोद व पातोंडयाच्या तरुणांना अटक*

प्रतिनिधी अमळनेर : बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या न्याहळोद व पातोंडा येथील दोघा तरुणांना अमळनेर पोलिसांनी बसस्थानकावर अटक केली आहे.*
१४ रोजी रात्री पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम याना गोपनीय माहिती मिळाली की बसस्थानक परिसरात दोन तरुण पिस्टल घेऊन फिरत आहेत. पो नि निकम यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे , पोलीस जितेंद्र निकुंभे , प्रशांत पाटील , गणेश पाटील , अमोल पाटील , उज्वलकुमार म्हस्के याना बसस्थानकावर आरोपींचा शोध घेण्यासाठी पाठवले. पोलिसांना पाहताच पाठीवर बॅग लटकवलले दोन तरुण पळू लागले. पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातली. दोघांना नावे विचारली असता त्यांनी खेमराज विजय पाटील वय २३ रा न्याहळोद धुळे , रोहित रामकृष्ण अहिरे वय २३ रा पातोंडा ता अमळनेर असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांच्या बॅग ची झडती घेतली असता त्यात काळ्या कपड्यात २५ हजार रुपये किमतीचे बनावट पिस्टल आढळून आले. पोलिसांनी दोघांविरुद्ध शस्र कायदा कलम ३ ,५ , ३७(१)(३) चे उल्लंघन कलम १३७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.