सामाजिक कार्यकर्ते ईश्वर सोनार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न.

प्रतिनिधी – एरंडोल येथील सामाजिक कार्यकर्ते ईश्वर सोनार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तसेच विविध गणेश मंडळात त्यांच्या हस्ते विधिवत पुजा करून आरती करण्यात आली.

एरंडोल शहरातील सामाजिक कार्यकर्ते ईश्वर सोनार हे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांनी विविध कार्यक्रम आयोजित केले होते.याप्रसंगी रक्तदान शिबिर घेण्यात आले व सुमारे २० ते २५ रक्तदात्यांनी स्वखुशीने रक्तदान केले.यावेळी शहरात सुरु असलेल्या गणपती उत्सवातील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी ईश्वर सोनार यांच्या हस्ते आरती व पुजा केली.
याप्रसंगी मुरली कोळी,समाधान पाटील,विशाल पाटील,मोहित सोनार,दिनकर पाटील,साईनाथ चौधरी, हरिष महाजन,राज पाटील,होनाजी बोरसे,अनिल पाटील,सुशील महाजन,अनंत अहिरे,शुभम अहिरे,जीवन पाटील,भावेश महाजन, करण वाघ,सोहम देशमुख,अनिल महाजन,सोनू पाटील, ज्ञानेश्वर महाजन आदी उपस्थित होते.