जळगावमहाराष्ट्र

* बांधकाम कामगारांना गृहपयोगी भांड्यांचा संच वाटप आ.किशोर पाटील यांच्या हस्ते*

पाचोरा प्रतिनिधी – ( आबा सूर्यवंशी)
भडगांव  रोड परिसरातील शिवतीर्थ जय किसान कॉलनी येथे दिनांक १७ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता एक सामाजिक व कल्याणकारी उपक्रम राबवण्यात आला. इमारत बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या मजुरांसाठी गृह उपयोगी भांड्यांचा संच वाटप करण्याचा कार्यक्रम कार्यसम्राट  आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन जनसेवक बंडूभाऊ केशव सोनार यांच्या प्रयत्नातून करण्यात आले होते.   या वेळी नगरसेवक महेश प्रकाश सोमवंशी, युवानेता सुमित किशोर पाटील, उपजिल्हा प्रमुख किशोर बारवकर, प्रविण ब्राह्मणे, योगेश पाथरवाट, दिलीप परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.  १५० बांधकाम मजुरांना गृह उपयोगी किटचे वाटप करण्यात आले. हर्षल सुनील, दामोदर कुणाल, मंगल धनगर, मनीष प्रभूलाल भोई, राज सोमवंशी, सागर बंडू सोनार यांनी  सहकार्य केले .
सदर उपक्रमामुळे कामगार बांधवांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. सामाजिक बांधिलकीतून पुढाकार घेऊन गरजूंना मदतीचा हात देण्याचा हा प्रयत्न असून सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button