पुणे येथे होणाऱ्या १८ वर्षांखालील राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी जळगांव जिल्हा संघाच्या कर्णधार पदी एरंडोलच्या जान्हवी पाटीलची निवड…….!

एरंडोल ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य कब्बडी असोसिएशन व पुणे जिल्हा कब्बडी असोसिएशन पुणे येथे १४ जून ते १८ जून २०२५ दरम्यान होणाऱ्या पहिल्या कुमार -कुमारी ( १८ वर्षांखालील )राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघ १३ जून २०२५ रोजी रवाना झाला.गेल्या १० दिवसापासून संघांचे सराव शिबीर ॲड.एस. ए. बाहेती महाविद्यालय, जळगाव येथे सुरु होते.जळगांव येथे झालेल्या पहिल्या कुमार – कुमारी गट स्पर्धेतून प्रथम संभाव्य २२ खेळाडूंची निवड झाल्यानंतर निवड समिती सदस्य प्रा. हरीश शेळके व कमलेश पाटील यांनी त्यातील अंतिम १४ खेळाडूंची निवड केली.यात एरंडोल येथील खेळाडू जान्हवी पाटीलची कुमारी गटाच्या कर्णधार पदी निवड झाल्याबद्दल तिचे एरंडोल वासियांकडून अभिनंदन होत आहे.एरंडोलकरांसाठी भुषणावह अशी ही बाब आहे.जान्हवी ही एरंडोल येथील प्रगतीशील शेतकरी पंडीत नामदेव पाटील यांची नात व संदीप पाटील यांची मुलगी आहे.
सराव शिबिरात संघाला आनंद महांगडे, अनिल कोळी, हरीश शेळके, कमलेश पाटील, सुरेश महाजन, विशाल सोनवणे, नम्रता गुरव यांनी मार्गदर्शन केले.निवड झालेल्या संघास जळगांव शहराचे आमदार राजू मामा भोळे,भाजपा जळगांव जिल्हा महानगर अध्यक्ष दिपकभाऊ सूर्यवंशी, नगरसेविका गायत्रीताई राणे, जळगांव जिल्हा कबड्डी असोसियशनचे अध्यक्ष मोहनराव भावसार, कार्याध्यक्ष शाम कोगटा,सरकार्यवाह नितीन बरडे, उपाध्यक्ष बशीर बागवान, चंद्रकांत लोढाया, खजिनदार सुनील राणे, गिरीश नाईक, ॲड .रोहन बाहेती,अरुण गावंडे,संजय संसारे,नयनसागर मनी, अनिल कोळी,भास्कर पाटील, विवेक पाटील,हितेश सोनी,हरीश शेळके, आनंद महांगडे, विनय चौधरी, दिपक बनसोडे यांनी शुभेच्छा दिल्या.
निवड झालेले संघ पुढीलप्रमाणे
*कुमार गट संघ*
हर्षल बागुले (कर्णधार)
अज्जू पटेल,निखिल वांद्रे,
सुयोग सोनवणे,जुनेद खाटीक,साहिल पिंजारी,मितेश सोनवणे, जयेश सपकाळे,
तेजस माळी,वरून सोनवणे, यश रायसिंग, रोहित महाजन,करण सपकाळे सुमित बावसकर
व्यवस्थापक- जीवन कोळी
प्रशिक्षक- सुरेश महाजन
*कुमारी गट संघ*
जान्हवी पाटील (कर्णधार)
साक्षी मराठे, वैष्णवी पाटील, पूर्वा बाविस्कर, राधिका मोटे, चैताली पाटील, संजना महाजन, माहिया मंडल, श्रद्धा महाजन, अपूर्वा मांढरे, कोमल महाजन, धनश्री मिस्तरी, काजल महाजन, हर्षदा माळी
व्यस्थापक- स्वप्नील गुरव
प्रशिक्षक- नम्रता गुरव
सदर स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी महाराज संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे पार पडणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांचे एकूण ३१ संघ सहभागी होणार आहेत.तसेच निवड स्पर्धेतून निवडण्यात आलेला संघ हरिद्वार (उत्तर प्रदेश) येथे २८ जून ते ०१ जुलै २०२५ पासून होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.या स्पर्धेसाठी २५ जिल्ह्यांतील सुमारे १,००० खेळाडू, प्रशिक्षक व व्यवस्थापक सहभागी होणार आहेत.