सरस्वती विद्या मंदिर येथे योग दिवस साजरा

अमळनेर ( प्रतिनिधी ) – विद्यार्थी आणि शिक्षक कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्य, निरोगीपणा आणि सजगता वाढवण्यासाठी योग सर्वोत्तम आहे असे प्रतिपादन सरस्वती विद्या मंदिर येथे मुख्याध्यापक रणजित शिंदे यांनी योग दिवस साजरा करतांना केले.
याप्रसंगी योग दिनाचे महत्त्व आणि योगाचे फायदे याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देत ताडासन ,वृक्षासन,पद्मासन, त्रिकोणासन, वज्रासन, शलभासन, भुजंगासन, पवणमुक्तासन , हलासन, सर्वांगासन, शवासन यासह प्राणायाम चे प्रात्यक्षिक मुख्याध्यापक रणजित शिंदे यांनी सहकारी ऋषिकेश महाळपूरकर यांचेसह योगासनाचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
याप्रसंगी विशेष उपस्थित असलेले कामगार कल्याण मंडळाचे केंद्रप्रमुख अजय पाटील व केंद्र सेवक राकेश चौधरी यांनी योग प्रशिक्षण देणारे मुख्याध्यापक रणजित शिंदे व ऋषिकेश महाळपूरकर यांचे सह उपस्थित शिक्षक वृंद यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.योग दिनाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी, शाळेतील विद्यार्थ्यांसह शिक्षक आनंदा पाटील,सौ.संगिता पाटील,सौ.गीतांजली पाटील,सौ.शितल पाटील, उपशिक्षक धर्मा धनगर आदींनी परिश्रम घेतले.