जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

*एरंडोल परिसरात मुसळधार पावसामुळे विहिरींच्या पाणीपातळीत चार ते पाच फूट वाढ.*

प्रतिनिधी एरंडोल:-शुक्रवारी दुपारी अडीच तास झालेल्या मुसळधार पावसामुळे विहिरींची जलपातळी  चार ते पाच फुटा ने वाढली आहे तसेच या पावसामुळे कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे कपाशीचे फुल -पाते खाली पडले आहेत.
                शुक्रवारी दुपारी अडीच वाजेपासून साडेपाच ते सहा वाजेपर्यंत एरंडोल परिसरात मेघ गर्जनेसह जोरदार पाऊस झाला यंदाच्या पावसाळ्यात दमदार असा हा पहिलाच पाऊस आहे. या पावसामुळे तालुक्यातील नदी नाले ओढे यांना पूर आले आहेत. काही भागात पिके पाण्यात बुडाली आहेत. दगडाच्या विहिरींची जलपातळी चार ते पाच फुटापर्यंत वाढली आहे तर मुरमाच्या विहिरी पूर्ण भरून ओसंडून वाहू लागल्या आहेत.
दरम्यान एरंडोल शहरा नजीक धरणगाव रस्त्याची झालेली दुरावस्था या पावसामुळे अधिक बिकट झाली आहे तसेच एरंडोल उत्राण रस्त्यावरील वाळू चोरी करणाऱ्या डंपर मुळे रस्त्याची वाट लागली आहे. २४ तास या रस्त्यावरून ये जा करणारे डंपर यांचा विचार करून एरंडोल उत्राण रस्त्याचे डांबरीकरण करावे अशी टीका केली जात आहे. हनुमंत खेडे सिम व उत्राण या भागातील वाळूचे लिलाव झाले नसल्यामुळे वाळू चोरांना रान मोकळे झाले आहे. प्रशासनाने कितीही कारवाया केल्या तरी वाळू चोरी हा प्रकार १०० टक्के बंद होणे शक्य नाही अशा प्रकारचा सूर जनमानसातून उमटत आहे. एरंडोल तालुक्यातील बहुतांश रस्त्यांची या मुसळधार पावसामुळे दैनावस्था झाली आहे.

*कोसळ धारेने भरल्या पाण्याच्या वाट्या…..*
अडीच तासाच्या मुसळधार पावसामुळे एरंडोल तालुक्यातील भालगाव तलाव, खडके सिम तलाव पद्मालय तलाव व चोरटक्की तलाव हे प्रमुख छोटे प्रकल्प पाण्याने तुडुंब भरले असून ओसंडून वाहत आहेत.
अंजनी धरण यापूर्वीच पूर्ण भरले असून धरणातून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button