एरंडोल येथे जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन साजरा.

प्रतिनिधी एरंडोल : येथील संजीवन व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र तर्फे २६ जून जागतिक अमली पदार्थ विरोधी दिवस व सामाजिक न्याय दिवस म्हणून राजश्री शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष निवृत्त कृषी सहाय्यक हैबतराव पाटील हे होते.
संस्थेचे अध्यक्ष रोहिदास पाटील यांनी संस्था राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती या प्रसंगी दिली तसेच प्रकल्प संचालक राजेंद्र ठाकरे यांनी समाजात युवक हा देशाचा आधारस्तंभ असून व्यसनमुक्त समाज निर्माण करू शकतो परंतु आज समाजामध्ये व्यसनाधिनतेचे प्रमाण अधिक वाढले आहे त्यासाठी युवकांनीच पुढे येऊन व्यसनाधीनतेला तीलां जली दिली पाहिजे असे मत व्यक्त केले.
जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून व्यसनापासून होणाऱ्या दुष्परिणामांची माहितीपत्रके ग्रामीण भागात व कॉलेज परिसरात वाटण्यात आली.
सदर कार्यक्रमास केंद्रातील रुग्ण व नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रकल्प संचालक राजेंद्र ठाकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन गोकुळ पाटील यांनी केले. कार्यक्रमास उपस्थित अजय महाजन, खुशाल महाजन, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.