माजी उपनगराध्यक्ष व दलितांचे नेते शालिग्राम गायकवाड यांचा पोलिसांतर्फे गौरव.

प्रतिनिधी एरंडोल-येथील बाजार समितीचे माजी सभापती तथा माजी उपनगराध्यक्ष शालिग्राम गायकवाड यांचा जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांचेहस्ते प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.
माजी उपनगराध्यक्ष शालिग्राम गायकवाड सुमारे चाळीस वर्षांपासून शहरात विविध सार्वजनिक,धार्मिक उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करीत आहेत.शहरातील
सर्व समाजांच्या कार्यक्रमात सहभाग घेऊन त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून सहकार्य केले आहे.त्यांनी दलीत वस्तीत स्वतः राहून दलितांचे प्रश्न सोडवले.त्यांच्या सुख दुःखात नेहमी सामील होतात.ते दलितांचे नेते असून नेहमी त्यांच्या उत्थानासाठी अग्रेसर असतात. त्यांच्या पाठीशी नेहमी दलीत बांधव उभे असतात.त्यांचा समाजात मनाचे स्थान आहे.त्यांच्या कार्यकाळात शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला.पोलीस प्रशासनाने त्यांनी
केलेल्या धार्मिक सामाजिक कार्याची दखल घेवून पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर
रेड्डी यांचे हस्ते त्यांना प्रमाणपत्र प्रदान करून गौरव केला.यावेळी
चाळीसगाव विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर,अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांचेसह कर्मचारी उपस्थित होते.