महामार्ग संदर्भात समिती घेणार ….यांची भेट…
प्रतिनिधी एरंडोल:-येथे २३ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी स्वामी समर्थ केंद्रात महामार्ग चौपदरीकरण समस्या निवारण नागरिक कृती समितीची बैठक माजी आमदार महेंद्रसिंग पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी अमळनेर नाका नजीकच्या हायवे क्रॉसिंग वर उड्डाणपूल, व बी एस एन एल ऑफिस जवळ अंडरपास या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांकरिता अधिक खासदार स्मिता वाघ व नंतर नामदार नितीन गडकरी यांची भेट घेण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. दोघ नेत्यांना भेटून चौपदरीकरणाच्या कामातील निर्माण झालेल्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करावा असे ठरवण्यात आले.
दत्त मंदिरापासून अमळनेर नाका क्रॉसिंग पर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूला समांतर रस्ते तसेच पथदिवे, गटारी, नाक्यावर ब्लिंकीगलाईट,, आदी मागण्यांबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी, माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, रमेश महाजन, माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन व राजेंद्र चौधरी, विजय महाजन, गोरख चौधरी, असलम पिंजारी माजी नगराध्यक्ष रवींद्र महाजन, जगदीश ठाकुर डॉक्टर सुरेश पाटील प्रसाद दंडवते शेणपुडू वाल्डे, अतुल महाजन, एडवोकेट दिनकर पाटील, हिम्मत महाजन, राजेंद्र राघो महाजन, प्रवीण महाजन आदी उपस्थित होते.