एरंडोल नगरपरिषदेचा सन २०२५-२६ या वर्षाचे करवाढरहित शिलकी अंदाजपत्रक सादर….!

प्रतिनिधी एरंडोल सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता एरंडोल नगरपरिषदेचा १५५ कोटी ५७ लक्ष रु.चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. प्रशासकीय सभेने ९८ लाख १८ हजार ८१० रू. चे शिलकीचे अंदाजपत्रक मंजुर केले आहे. सदर अंदाजपत्रकामध्ये एरंडोल वासियांना नागरी मुलभुत सुविधा पुरविण्यासाठी भरीव स्वरुपात तरतुद करण्यात आलेली आहे. तथापि केलेल्या तरतुदीवरील होणारा खर्च विचारात घेता व न. पा.च्या उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने अनावश्यक खर्चात कपात करणे, वर्षात काटकसर करणे व पालिका स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आलेली आहे. मात्र कोणतीही करवाढ सुचविण्यात आलेली नाही.

सदर अर्थसंकल्पात अमृत योजना २.० नुसारे जुने पद्मालय देवस्थान विकसित करणे, अमृत योजना २.० शहरी पाणी पुरवठा विकसित करणे, भुमिगत गटार सांडपाणी व्यवस्थापन, नदी संवर्धन योजना व नदी सुशोभिकरण योजना राबविणे, अल्पसंख्यांक विश्वास निधी, दलितवस्ती व दलितेत्तर निधी, वैशिष्टयपूर्ण, नगरोत्थान, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना अशा योजनांसाठी शहरवासियांच्या दृष्टीने सुखसुविधा पुरविणेसाठी भरीव प्रमाणात भांडवली तरतुद करण्यात आलेली आहे. शहरातील दिव्यांग व्यक्तींना त्यांचे हक्काचे दिव्यांग भवन उभारण्यासाठी तरतुद केलेली आहे.
तसेच शहरी पा.पु., सार्वजनिक सुरक्षितता, साफसफाई व कर्मचा-यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विमा संरक्षणसाठी सुध्दा तरतुद करण्यात आलेली आहे. न.पा.च्या अंदाजपत्रकात दलित वस्ती सुधार योजनेतील विकास कामे, १५ वा वित्त आयोग फेरीवाला धोरण, शहर विकास आराखडा, शहर स्वच्छता आराखडा, नागरी घनकचरा व्यवस्थापन, राष्ट्रीय पुरुषांचे पुतळे संरक्षण व सुशोभीकरण करणे, कार्यालयाचे संगणकीकरण तसेच नवीन प्रशासकीय इमारतीत कार्यालय स्थलांतरीत करुन कार्यालयाचे नूतनीकरण करणे, पुरातन वास्तु संवर्धन करणे, नागरी मुलभुत सुविधा पुरविणे इ. या बाबीवर भर देण्यात आलेला आहे.
एरंडोल न.पा.चे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. अमोल बागुल बांच्या मार्गदर्शनाखाली श्री. विनोदकुमार पाटील कार्यालय अधिक्षक, श्री. शरद राजपुत लेखापाल, श्री. कपिल भावसार लेखापरिक्षक, श्री. दगडू मराठे करनिरिक्षक, श्री. जितेश पाटील पा.पु. अभियंता, श्री. श्रीकांत बिऱ्हाडे विदयुत अभियंता, श्री. हितेश जोगी कर निर्धारक सेवा, श्री. राजेंद्र पाटील रोखपाल, श्री. लक्ष्मण पाटील लिपीक यांनी सदर अंदाजपत्रक तयार करणेसाठी परिश्रम घेतले.