*एरंडोल विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी राजेंद्र चौधरी व व्हाईस चेअरमनपदी राजधर महाजन यांची बिनविरोध निवड…….!

प्रतिनिधी एरंडोल – येथे एरंडोल विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची विशेष बैठक सहकार अधिकारी संगीता साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली होऊन चेअरमनपदी राजेंद्र दोधू चौधरी व व्हाईस चेअरमन म्हणून राजधर संतोष महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली.विशेष हे की या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड बिनविरोध करण्याची अनेक वर्षांपासूनची परंपरा याहीवेळा कायम राखण्यात आली.
नवनिर्वाचित चेअरमन राजेंद्र चौधरी व व्हाॅईस चेअरमन राजधर महाजन यांची बिनविरोध निवड जाहीर झाल्यावर त्यांचा शाल , पुष्पहार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी दुर्गादास महाजन, रमेश महाजन यांची समोयोचित भाषणे झाली.प्रास्ताविक संस्थेचे सचिव बापू नामदेव पाटील यांनी केले.यावेळी दुर्गादास महाजन, रमेश महाजन, रविंद्र महाजन, ॲड.नितीन महाजन, पंडित पाटील,योगराज महाजन,विजय महाजन,इच्छाराम महाजन, सुमनताई माळी,निर्मलाबाई महाजन इत्यादी संचालक तसेच मन्साराम माळी, युवराज महाजन,निंबा माळी हे उपस्थित होते.