पद्मालय-गालापूर शेती परिसरात नेहमी होणार्या वाढत्या चोर्या-चिंता
भुरटे चोर झाले शिरजोर-पोलिसांचा वचकच नाही-तपास शून्य-शेतकरींमध्ये संताप

प्रतिनिधी एरंडोल – शहर परिसरात अवैध धंदे बोकाळले असून पद्मालय-गालापूर शेती परिसरात होणार्या वाढत्या चोर्यांमुळे शेतकरी वैतागले आहेत. पोलिसांचा धाक, वचकच राहिला नसून चोर मात्र शिरजोर झाल्याने तपास देखील शून्य झाल्याची तक्रार आहे. शेतकरी लक्ष्मीकांत ज. दंडवते यांनी एरंडोल पोलिसांना लेखी तक्रार, ऑनलाईन तक्रार देवून देखील काहीही दखल घेतली नाही. शेवटी जिल्हा पोलिस प्रमुख (एसपी) यांचेकडे लेखी तक्रार देवून जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार यांना माहितीसाठी निवेदनाची तक्रार करावी लागली. यास म्हणावे तरी काय ? असा संतप्त सवाल केला आहे.
यासंदर्भातील सविस्तर माहिती अशी की, पद्मालय-गालापूर शिवारातील शेतकरी लक्ष्मीकांत दंडवते यांची शेती (वडीलोपार्जित) असून या परिसरात नेहमीच चोर्या होतात. इले. डीपीमधील ऑईल अथवा इले. तारांची चोरी यासह शेती अवजारांची चोरी होते. त्याच परिसरातील भुरट्या चोरांचा सुळसुळाट असल्याचे स्पष्ट सांगून देखील पोलिसांनी दखल घेतली नाही अथवा चोरींचा तपास नाही. त्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. मोठ्या हौसेने पद्मालयला जाणार्या भाविकांसाठी रेस्टॉरंट (हॉटेल) सुरू केले परंतू तेथील साहित्यांची देखील चोरी झाल्याने शेवटी बंद करावे लागले. जंगली श्वापदांची (बिचारे) भिती असून देखील भूरटे चोरांच्या भितीने हतबल झाले आहेत. अनेक शेतकर्यांनी भिती, चोरीस वैतागून स्वस्त भावाने शेती देखील विकली आहे. आता बोला….
पोलिस तपास होवून चोरांना अद्दल घडावी, भुरट्या चोरांचा बंदोबस्त व्हावा हीच आमची अपेक्षा. आता उठा, जागे व्हा… उघडा डोळे बघा नीट… एवढेच….