जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र
सुनील पाटील यांची प्रदेश परिषदेवर नियुक्ती.

प्रतिनिधी एरंडोल-येथील माजी नगरसेवक तथा संजय गांधी निराधार योजना समितीचे माजी
अध्यक्ष सुनील (भैय्या) पाटील यांची भाजपच्या प्रदेश परिषदेवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.जळगाव जिल्हा पच्छिम विभागातून त्यांची निवड करण्यात आल्याचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी पत्राद्वारे कळवले आहे.
सुनील पाटील यांनी यापूर्वी पक्षाचे शहराध्यक्ष,विधानसभा क्षेत्रप्रमुख काम पाहिले आहे.मंत्री गिरीश महाजन,केंद्रीयमंत्री
रक्शाताई खडसे,खासदार स्मिताताई वाघ,जिल्हाध्यक्ष डॉ.राधेशाम चौधरी,भाजप
जनजातीय क्षेत्राचे प्रमुख advt.किशोर काळकर,माजी नगराध्यक्ष रमेश
परदेशी,तालुकाध्यक्ष योगेश महाजन,माजी तालुकाध्यक्ष एस.आर.पाटील यांचेसह
पदाधिका-यांनी सुनील पाटील यांच्या निवडीचे स्वागत केले.