एरंडोलला आषाढी एकादशीनिमित्त एरंडोलला विविध कार्यक्रम.

प्रतिनिधी – एरंडोल शहरासह ग्रामीण भागातील विविध सामाजिक व धार्मिक संघटनांच्यावतीने
आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.शाळकरी मुलांनी काढलेल्या वारकरी दिंड्या कार्यक्रमांचे विशेष आकर्षण ठरले.तसेच
विविध ठिकाणी भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले.
भालगाव येथे हजारो भाविकांना फराळाचे वाटप.
भालगाव (ता.एरंडोल) येथील प्रती पंढरपूर म्हणून ओळख असणा-या विठ्ठल
मंदिरात हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.सामाजिक कार्यकर्ते
मनोज मराठे यांचेतर्फे हजारो भाविकांना फराळ,केली व चहाचे वाटप करण्यात आले.मागील चौदा वर्षांपासून मनोज मराठे हे दरवर्षी भाविकांना फराळ वाटप करत आहेत.आषाढी एकादशीनिमित्त मंदिर परिसरात यात्रा भरली होती.यात्रेतील
दुकानांवर संसारोपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी महिलांनी गर्दी केली
होती.मंदिरात दिवसभर भजन,कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.सायंकाळी
गावातून हजारो भाविकांच्या उपस्थितीत पालखी मिरवणूक काढण्यात आली.मंदिर
संस्थांचे अध्यक्ष देविदास मराठे,माजी सरपंच कैलास मराठे,नामदेव
पाटील,सुभाष पाटील,छोटू मराठे,गोविंदा मराठे,ईश्वर मराठे यांचेसह
पदाधिका-यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड
यांचे मार्गदर्शनाखाली पोल्स बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.
जाजू प्राथमिक विद्या मंदिर.
एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळ संचालित रा.हि.जाजू प्राथमिक विद्या मंदिरात
विविध कार्यक्रमांचे आयोजन करून आषाढी एकादशी साजरी करण्यात आली.शाळेतील
विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून गावातून पालखी मिरवणूक
काढली.पालखीचे ठिकठीकाणी स्वागत करण्यात आले.मुख्याध्यापिका जयश्री
कुलकर्णी व उपस्थित शिक्षकांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले.वारकरी
दिंडीत विद्यार्थ्यांनी बैठी फुगडी खेळून आनंद लुटला.यावेळी शिक्षक व
शिक्षिका देखील वारकरी वेशभूषेत सहभागी झाले होते.मुख्याध्यापिका जयश्री
कुलकर्णी यांचेसह शिक्षकांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.
न्यू इंग्लिश मेडियम स्कूल-
एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळ संचालित न्यू इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये
आषाढी एकादशी आषाढ वृक्ष संवर्धन वारी साजरी करण्यात आली.रामनाथ तिलोकचंद
काबरे विद्यालयापासून विद्यार्थ्यांनी वारकरी वेशात सहभागी होऊन शहरातून
पालखी मिरवणूक काढली.संस्थेचे अध्यक्ष शरद काबरे,सचिव राजीव मणियार,शालेय
समितीचे अध्यक्ष डॉ.नितीन राठी,अनिल बिर्ला,धीरज काबरे,परेश बिर्ला,सतीश
परदेशी,प्राचार्य हॅरी जॉन पॉल यांचेहस्ते पालखी पूजन करण्यात
आले.मिरवणुकीत मित्रा चव्हाण,भाग्यश्री महाजन विठ्ठलाच्या वेशभूषेत
हर्षाली पाटील व हर्षिता पाटील रुख्मिणी मातेच्या वेशभूषेत सहभागी झाले
होते.पालखी मिरवणूक उद्योजक संजय काबरा यांचेसह विविध संघटनांचे
पदाधिकारी सहभागी झाले होते.संस्थेचे अध्यक्ष शरद काबरे यांचेवतीने सर्व
विद्यार्थ्यांना उपवास चिवडा वाटप करण्यात आला.तसेच शाळेच्यावतीने शिक्षक
व विद्यार्थ्यांना फराळ वाटप करण्यात आला.
बालशिवाजी प्राथमिक विद्या मंदिर-
यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळ संचालित बालशिवाजी प्राथमिक विद्या
मंदिर आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले
होते.संस्थेचे अध्यक्ष अमित पाटील,दादासाहेब पाटील महाविद्यालयाचे
प्राचार्य डॉ.ए.जे.पाटील,उपप्राचार्य डॉ अरविंद बडगुजर,मुख्याध्यापिका
संगिता वाघ यांचेहस्ते पालखी पूजन तसेच विठ्ठल रुख्मिणी यांच्या मूर्तीचे
पूजन करण्यात आले.यावेळी वारकरी वेशात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी
शहरातून वारकरी दिंडी काढली.कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेतर
कर्मचा-यांनी सहकार्य केले.