एरंडोलला सूर्योदय ज्येष्ठ नागरीक संघातर्फे गुणवंत पाल्यांचा सत्कार

प्रतिनिधी एरंडोल – येथील सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे सभासदांच्या 254 नातवंडांना इ. 1 ली ते 12 वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थींना शालेय साहित्य, वही, पेन, प्रमाणपत्रासह अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. यावेळी रामदास पिंगळे, गुलाबराव पवार, आत्माराम अहिरे, एन. डी. पाटील, डी. एस. पाटील, सखाराम ठाकूर, रामदास महाजन यांचे हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी निवृत्त तहसिलदार अरूण माळी होते. सूत्रसंचालन संस्थेचे सचिव विनायक कुळकर्णी यांनी केले.
सुरूवातीस मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन तसेच सरस्वती, विठ्ठल-रूख्मिणी प्रतिमेला माल्यार्पण करून पुजन करण्यात आले. खरा तो एकचि धर्म या सानेगुरूजींच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी संस्थेतर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित विद्यार्थ्यांनी बालगीत सादर केली. चि. अनुष पाटील, कु. नेहा बडगुजर या विद्यार्थ्यांनी संस्थेची महती, शिक्षणाचे महत्व या विषयावर इंग्रजीत मनोगत व्यक्त केले. एन. डी. पाटील, सखाराम ठाकूर, नामदेवराव पाटील, विश्वनाथ पाटील, प्रा. शिवाजीराव अहिरराव, निंबा बडगुजर यांनी आदर्श नागरीक घडण्यासाठी मुलांनी प्रयत्न करावे असे आवाहन करीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अध्यक्षिय भाषणात अरूण माळी यांनी विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी अभ्यास करा, आई-वडील, आजी-आजोबा यांची सेवा करण्याचे आवाहन करून संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे उपाध्यक्ष जाधवराव जगताप, वसंतराव पाटील, पी. जी. चौधरी सर, सुरेश देशमुख, विश्वनाथ पाटील, जगन महाजन, गणेश आप्पा, भगवान महाजन, सुपडू शिंपी यांचेसह सभासदांनी परिश्रम घेतले. अल्पोपहार आणि आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.