एरंडोल येथे साई गजानन संस्थानातर्फे गुरुपौर्णिमा उत्सव. उत्साहात,दर्शनासाठी व महाप्रसादा साठी मोठ्या संख्येने भाविकांचा उत्साह..

प्रतिनिधी एरंडोल :येथील साई गजानन संस्थानातर्फे सालापादाप्रमाणे गुरु पौर्णिमा उत्सव सकाळी साडेपाच वाजेपर्यंत साईबाबा व श्री गजानन बाबा यांच्या मुर्त्यांचे मंगल स्नान करण्यात आले. या यात हजारो भाविकांनी आपला सहभाग नोंदविला. उत्सवाचे हे अठरावे वर्षे आहे. गजानन बाबांचे विजय ग्रंथाचे पारायण व साईबाबांच्या ग्रंथाचे पारायण समाप्ती देखील याच दिवशी असते. दिवसभर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.
मंगल स्नान झाल्यानंतर सकाळी १० वाजेपासून ते २.०० वाजेपर्यंत साईबाबा व गजानन बाबा यांची पादुकांची गावातून भव्य पालखी मिरवणूक वाजत गाजत काढण्यात येते.
पालखी मिरवणुकीत अश्वाचा देखील सहभाग असतो.भाविक मोठ्या संख्येने पालखी मिरवणुकीत सहभाग घेतात. या पालखी मिरवणुकीत महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो.
सायंकाळी पाच वाजेपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत. महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येते. संस्थांच्या व शहराच्या परंपरेनुसार येथे पूर्ण शहरवासी महाप्रसादासाठी पोळ्या आपल्या घरून करून मंदिरात आणून देत असतात. यामुळे आपण देखील अन्नदानात सहभागी आहोत व अन्नदानाचे पुण्य आपल्यालाही लागते अशी श्रद्धा आहे. महाप्रसाद साठी शहरातून जवळपास ,२५ ते ३० हजार नागरिक महाप्रसादाचा लाभ घेतात.
गुरु पौर्णिमा महोत्सवानिमित्त संपूर्ण मंदिर परिसराला लाइटिंग व फुलांनी सजवलेले असते. मंदिरात दिवसभर भजनांचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो. रात्री बारा वाजता दोन्ही बाबांचे आरती करून कार्यक्रमाची सांगता होत असते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण साई गजानन परिवारातील सदस्य, भक्त परिवार, महिला ,पुरुष युवा वर्ग परिश्रम घेत असतो.