एरंडोल पोलीस स्टेशनचा तालुका गुरुपौर्णिमा उत्सव.

प्रतिनिधी एरंडोल:-येथील पोलीस स्टेशन तर्फे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एक अभिनव पद्धतीने गुरुपौर्णिमा उत्सव प्रथमच साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम डीडीएसपी महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये घेण्यात आला.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष
प्रांताधिकारी मनीष कुमार गायकवाड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए जे पाटील , उप प्राचार्य डॉ. अरविंद बडगुजर यांची विशेष उपस्थिती होती.
तालुक्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, उपप्राचार्य, व त्यांचे एक प्रतिनिधी सदर कार्यक्रमास उपस्थित होते. तालुक्यात प्रथमच पोलीस प्रशासनातर्फे गुरुधनांचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांच्या हास्ते शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक
पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. नरेंद्र गायकवाड आभार प्रदर्शन पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल पाटील यांनी केले
यावेळी एरंडोल पोलीस स्टेशनचे कर्मचारी योगेश महाजन, दीपक पाटील, भाऊसाहेब मिस्त्री, दीपक अहिरे, मुकेश आमोदकर, ललिता नारखेडे, सचिन पाटील, आकाश शिंपी. यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.