जळगावदेश-विदेशमहाराष्ट्र

*मालमत्ता करावरील  (दंड) माफीसाठी अभय योजना*
  नगरपरिषदेचे नागरीकांना  जाहिर आवाहन*

पाचोरा प्रतिनिधी *(आबा सूर्यवंशी)*
राज्यातील नगरपालिका / नगरपरिषद व नगरपंचायती क्षेत्रामध्ये अनेक वेळा मालमत्ता कराची थकबाकीची रक्कम जास्ती असणे,  मालमता धारक यांची आर्थिक अडचण असणे व इतर कारणांमुळे मालमत्ता कराचा भरणा करण्यात येत नाही. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १५० (अ) (१) नुसार बिलाच्या न भरलेल्या रकमेवर दरमहा २% शास्ती (दंड) लावण्याचे प्रावधान आहे. यामुळे मालमता धारक यांच्या एकूण थकबाकी मध्ये वाढ होऊन याचे विपरीत परिणाम कर वसुलीवर होता. यावर उपाययोजना म्हणून नगरपरिषद क्षेत्रातील थकीत मालमत्ता करा वरील शास्ती माफ करून कर वसुली करण्यासाठी प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने अभय योजना लागू करण्याबाबत शासन स्तरावर विचार करण्यात आलेला आहे.
त्यानुसार नगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायत क्षेत्रामधील मालमता धारकांकरिता महाराष्ट्र शासन, नगरविकास विभाग, शासन निर्णय क्र. एमयुएम-२०२५/प्र.क्र.७०/नवी १७, दिनांक १/५/२०२५ रोजी मालमत्ता करा वरील शास्ती (दंड) माफ करणे कामी अभय योजना प्रोत्साहनात्मक राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सदर योजनेमध्ये ज्या थकीत मिळकत धारकांची थकबाकी आहे. अशा मिळकत धारकांनी मालमत्ता करावरील शास्ती (दंड) अंशतः किंवा पूर्णतः माफ करण्यासाठी मिळकत कराची पूर्ण रक्कम भरून विहित नमुन्यात अर्ज सादर शकतील. त्याबाबत अटी-शर्ती करविभाग नगरपरिषद कार्यालय पाचोरा येथे कार्यालयीन वेळेत पहावयास मिळतील
.*अभय योजना एकदाच लागू आहे.*
थकीत मालमत्ता कराच्या रकमेवरील फक्त शास्तीस (दंड) अभय योजना लागू आहे., जे मिळकत धारक शास्ती (दंड) वगळता इतर थकीत मालमता कराची संपूर्ण रक्कम भरतील त्यांच्या  बाबतीतच शास्तीच्या (दंड) सवलतीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात येईल., सदर योजनेच्या लाभ देणे कामी नगर परिषदेकडे मिळकत धारकांनी प्रस्ताव / विहित नमुन्यात अर्ज देणे  आवश्यक आहे., दिनांक १९/५/२०२५ नंतरच्या थकबाकी शास्तीस (दंड) अभय योजना लागू राहणार नाही., प्रस्ताव सादर करताना आधार कार्ड छायांकित प्रत मालमत्ता कराची मागणी बिल छायांकित प्रत संपूर्ण कर कराची रक्कम भरलेल्या पावतीची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे., सदर प्रस्ताव / विहित नमुन्यातील अर्ज दि.१४ /०७/२०२५ पासून ते दि.३१/७/२०२५ पर्यंत नगरपरिषद  कार्यालयात सादर करावा. तरी थकीत शास्ती (दंड) वगळता कराची इतर रक्कम तात्काळ भरून शास्ती (दंड) माफी अभय योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन
मुख्याधिकारी,/ प्रशासक श्री. मंगेश देवरे ,पाचोरा नगरपरिषद पाचोरा
यांनी नागरिकांना केले आहे
*टिप*- अधिक माहितीसाठी करविभाग नगरपरिषद, पाचोरा येथे कार्यालयीन वेळेत माहिती मिळेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button