गरिबी ही यशाच्या मार्गातील अडथळा नसून प्रेरणा ठरु शकते – माजी उपनगराध्यक्ष शालिग्राम गायकवाड .

प्रतिनिधी – एरंडोल गरिबी ही यशाच्या मार्गातील अडथळा नसून तीच प्रेरणास्थान ठरु शकते असे मत माजी उपनगराध्यक्ष शालिग्राम गायकवाड यांनी हे सिद्ध करणाऱ्या तालुक्यातील दोन विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी व्यक्त केले.यावेळी शहरातील प्रसिद्ध दंतरोग तद्न्य डॉ.मकरंद पिंगळे व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
एरंडोल शहरातील अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या लहानपणी वडिलांच्या आकस्मित निधनानंतर आईने घराघरांमध्ये धुणी भांडी घासून तेजश्री ईश्वर बिऱ्हाडे ला शिकवलं आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला तर यश गौतम सोनवणे हा रिक्षा चालकांचा मुलगा त्याने थेट आय.आय. टी.खरगपूर येथील जागतिक दर्जाच्या संस्थेत आपले स्थान निश्चित केले.विशेष हे की त्याने कुठल्याही कोचिंग क्लासला ऍडमिशन न घेता हे यश संपादन केले.त्याने सोशल मीडियावरून मार्गदर्शन घेतले व यश संपादन केले.याबद्दल त्यांच्या माजी उपनगराध्यक्ष शालिग्राम गायकवाड व डॉ.मकरंद पिंगळे यांनी सत्कार करुन त्यांच्या स्वप्नांना बळ दिले.याप्रसंगी दोघं विद्यार्थ्यांचे पालक हजर होते.