क्राईमजळगावदेश-विदेशमहाराष्ट्र

अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांची कारवाई

प्रतिनिधी एरंडोल-  मा. पोलीस अधिक्षक सो.जळगाव यांचे आदेशाने ऑल आऊट स्किम मोहिमे अंतर्गत कासोदा पोलीस स्टेशन हद्दीत आंबे-बाम्हणे ता.एरंडोल गावी ताडे रस्त्याच्या बाजुला असलेल्या चाऱ्याच्या कुट्टीच्या पत्री शेडच्या आडोशाला किरण भारत पाटील वय-३९ वर्ष रा. ब्राम्हणे ता. एरंडोल या इसमावर अचानक २०.०० वा. छापा टाकुन त्यास जागीच पकडले. त्याचे कब्जात खालील नमुद वर्णनाचा व किंमतीचा प्रोव्ही गुन्हाच्या माल मिळुन आला.
१) 3360/- रूपये किंमतीच्या मॅकडॉल नं. १ (व्हिस्की) कंपनीच्या, १८० मिली मापाच्या, विदेशी दारुच्या २१ काचेच्या बाटल्या, प्रत्येकी १६० रुपये किंमतीच्या सिलबंद बाटल्या.
२) ४४८०/- रूपये किंमतीच्या रॉयल चालेन्ज कंपनीच्या, १८० मिली मापाच्या, विदेशी दारुच्या १८प्लास्टीकच्या बाटल्या, प्रत्येकी २६० रुपये किंमतीच्या सिलबंद कि.अं.
3)६३००/- रूपये किंमतीच्या गोवा जिन कंपनीच्या, १८० मिली मापाच्या, विदेशी दारुच्या ३६ प्लास्टीकच्या बाटल्या, प्रत्येकी १७५ रुपये किंमतीच्या सिलबंद किं. अं.
४)५५१०/- रूपये किंमतीच्या ओल्ड मन्क (रम) कंपनीच्या, १८० मिली मापाच्या, विदेशी दारुच्या३८काचेच्या बाटल्या, प्रत्येकी १४५रुपये किंमतीच्या सिलबंद किं. अं.
५)९४५/- रूपये किंमतीच्या मॅकडॉल (रम) कंपनीच्या, १८० मिली मापाच्या, विदेशी दारुच्या ७ प्लास्टीकच्या बाटल्या, प्रत्येकी १३५ रुपये किंमतीच्या सिलबंद किं, अं.
६)४२००/- रूपये किंमतीच्या रॉयल स्टंग (व्हिस्की) कंपनीच्या, १८० मिली मापाच्या, विदेशी दारुच्या २१ प्लास्टीकच्या बाटल्या, प्रत्येकी २०० रुपये किंमतीच्या सिलबंद.  किं.अं.
७)३२५०/- रूपये किंमतीच्या ऑफीसर्स चॉईस कंपनीच्या, १८० मिली मापाच्या, विदेशी दारुच्या २६ प्लास्टीकच्या बाटल्या, प्रत्येकी १२५ रुपये किंमतीच्या सिलबंद किं.अं.
८)७६०/- रूपये किंमतीच्या देशी दारु सखु संत्रा कंपनीच्या, ९० मिली मापाच्या, देशी दारुच्या १९ प्लास्टीकच्या बाटल्या, प्रत्येकी ४० रुपये किंमतीच्या सिलबंद किं. अं.
९)४३०५/- रूपये किंमतीच्या टँगो पंच कंपनीच्या, ९० मिली मापाच्या, देशी दारुच्या १२३ प्लास्टीकच्या बाटल्या, प्रत्येकी ३५ रुपये किंमतीच्या सिलबंद कि. अं.
१०)४८६५/- रूपये किंमतीच्या देशी दारु सोफ डिलक्स कंपनीच्या, ९० मिली मापाच्या, देशी दारुच्या १३९ प्लास्टीकच्या बाटल्या, प्रत्येकी ३५ रुपये किंमतीच्या सिलबंद किं.अं.३८१७५ /- रुपये एकूण

वरील वर्णानाचा व किंमतीचा आरोपी नामे किरण भारत पाटील रा बाम्हणे ता एरंडोल याच्या कब्जातुन मिळुन आलेल्या प्रोव्हीशन गुन्ह्याचा मुद्देमाल ताब्यात घेतला. 

 आज दिनांक.२१ जुलै रोजी २०.०० वाजता किरण भारत पाटील वय-३९ वर्ष रा. ब्राम्हणे ता. एरंडोल हा गैरकायदा विना पास परवाना वरील वर्णनाच्या व किंमतीच्या देशी व विदेशी दारुच्या बाटल्या चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने कब्जात बाळगतांना मिळुन आला, म्हणून त्याचेविरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button