जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न.

प्रतिनिधी – एरंडोल तालुक्यातील खर्ची येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी 55 रक्तदात्यांनी केले.
         खर्ची येथे माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नानाभाऊ महाजन पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष पश्चिम विभाग राधेश्याम चौधरी  यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी यांनी रक्तदान करण्या संदर्भात अहिरणी भाषेतून ग्रामीण  भागातील महिला व ग्रामस्थांना रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले.प्रस्ताविक जि.प. चे माजी सदस्य नानाभाऊ महाजन यांनी केले तसेच प्रथम रक्तदानास नानाभाऊ महाजन यांनी रक्तदान करून सुरुवात केली.यावेळी भाजपा पश्चिम विभागाच्या जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी,माजी जि.प.सदस्य नानाभाऊ पोपट महाजन,तालुका अध्यक्ष योगेश देवरे, सरचिटणीस अमरजीतसिंग पाटील,समन्वयक निलेश परदेशीं,तालुका कार्य सदस्य संदीप पाटील,माजी जि.प. सदस्य जयश्री महाजन, माजी जि.प.सदस्य भिका कोळी,अजितसिंग पाटील, तालुका उपाध्यक्ष आनंदा चौधरी,शेतकी संघ उपाध्यक्ष संजय जाधव,रिंगणगाव माजी उपसरपंच ज्ञानेश्वर हवालदार,गुड्डू रवंजे बु., सरपंच नामदेव महाजन, विखरण सरपंच गोपाल महाजन, विलास पाटील, आशाताई विठ्ठल महाजन सरपंच खर्ची बुद्रुक,मकसूद पटेल,शालिक महाजन, अरुण महाजन,संदीप पाटील ,पिंटू राजपूत, ज्ञानेश्वर बडगुजर,किरण नन्नवरे,शेखर महाजन व रेड प्लस बँक जळगाव चे प्रमुख अकबर अली सय्यद, कर्मचारी तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी 55 रक्तात्यांच्या वतीने रक्तदान करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button