ताज्या बातम्याशैक्षणिक
एरंडोल येथे डीडीएसपी महाविद्यालयात मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक रथाचे उत्साहात स्वागत .

प्रतिनिधी एरंडोल: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक तर्फे काढण्यात आलेल्या मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक रथाचे १३ फेब्रुवारी २०२५ रोजी येथे डीडीएसपी महाविद्यालयात आगमन झाले असता प्राचार्य, डॉक्टर अनिल जे पाटील, केंद्र संयोजक प्राध्यापक नितीन व्ही पाटील यांनी उत्साहात स्वागत केले. यावेळी चलचित्र फीत द्वारे विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या शिक्षणक्रमासोबत नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल माहिती मिळाली.
उप प्राचार्य डॉक्टर अरविंद बडगुजर, प्राध्यापक एन ए पाटील, केंद्र संयोजक प्रा नितीन पाटील , केंद्र सहाय्यक विशाल चव्हाण, केंद्र सेवक दिनेश पवार प्राध्यापक वृंद विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.